कोरोना व्हायरसच्या नंतर सुद्धा बहुतांश कर्मचारी करतील Work From Home, रिपोर्ट्समध्ये समोर आली माहिती
Work From Home | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जगभरासह देशात अद्याप कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम आहे. पण काही नियम जरी शिथील करण्यात आले तरीही अजून बहुतांश ऑफिसे सुरु झालेली नाहीत. त्यामुळेच कर्मचारी गेल्या 10 महिन्यांपासून अधिक वेळ घरुनच काम करत आहेत. याच दरम्यान आता देशातील CXO च्या नुसार, कोरोना व्हायरच्या परिस्थितीनंतर सुद्धा मोठ्या संख्येने कर्मचारी घरुनच काम करतील असे त्यांच्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे. याबद्दलची माहिती डेलॉयट मध्ये दिली गेली आहे.(Indian Economy: 2021 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 11.5 टक्के होईल; चीनसह अनेक देशांना मागे टाकेल भारतीय अर्थव्यवस्था- IMF)

रिपोर्ट्सनुसार, ऑफिसपासून दूर किंवा फ्लिक्झिबल कामांच्या तासांकरिता काही बदल करण्यात आले आहेत. अशातच डेलॉयट यांनी असे म्हटले की, कोरोना व्हायरसची परिस्थिती आणि लॉकडाऊन उठवल्यानंतर सुद्धा कर्मचारी ऑफिसपासून दूरु असलेल्या ठिकाणावरुन कामे करतील असे भारतामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.(Digital Voter-ID Cards: आता मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड; डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या)

डेलॉयटच्या ग्लोबल रिजिल्यंस रिपोर्ट 2021 मध्ये असे म्हटले आहे की, वर्ष 2020 मुळे कर्मचाऱ्यांच्या कामात बदलाव झाल्याचे दिसून आले आहेत. सर्वेतील 70 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांनी असे म्हटले आहे की, त्यांना पुढे जाऊन सुद्धा कधीकधी किंवा नियमितपणे या पद्धतीचा बदल दिसून येणार आहे. जागतिक स्तरावर ही बाब मानणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 62 टक्के आहे.