
PMC बँक घोटाळ्यानंतर आणखी एक बँक सध्या आर्थिक संकटाला सामोरे जाताना दिसत आहे. आदित्या बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर त्यातील पैसे काढा कारण ही बँक लवकरच त्यांचा कारभार बंद करणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने आयडिया पेमेंट बँकेला आपला कारभार संपवण्यासाठीची परवानगी दिली आहे.
आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आपला कारभार संपवण्याची जाहीर घोषणा केली होती. तसेच त्यांनी ही माहिती देताना, काही आकस्मिक घटनांमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं सांगितलं होतं.
आयडिया सेल्युलरने आयडिया मोबाइल कॉमर्स सर्व्हिसेस ही कंपनी पेमेंट बँकेत एप्रिल 2016 मध्ये विलीन केली. त्यानंतर त्याला आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक असं नाव देण्यात आलं. आणि या बँकेला 2015 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेमेट बँकेचं लायसन्स मिळालं होतं. महत्त्वाचे म्हणजे आता ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर एअरटेल, पेटीएम, जिओ, इंडिया पोस्ट यासारख्या प्रमुख कंपन्यांची पेमेंट बँक सेवा उपलब्ध असेल.
बँकेने आपल्या ग्राहकांना दिलेल्या संदेशानुसार त्यांनी आपला बॅलन्स लवकरात लवकर ट्रान्सफर करावा अथवा खात्यातून लवकरात लवकर पैसे काढावे.