झारखंड येथे भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू
Representational Image (Photo Credit: File Photo)

झारखंड (Jharkhand )येथील महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

रांची जवळ असलेल्या कूजू घाटात डंपर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. बिहारच्या भोजपूर येथून एका कार्यक्रमावरुन एक कुटुंब घरी येण्यासाठी निघाले होते. त्यावेळी घाटात कार डंपरवर जाऊन जोरात आदळ्याने ही दुर्घटना झाली आहे.

या भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला असून त्यात पाच पुरुष मंडळी, तीन मुले आणि दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृत व्यक्तींना रामगड हॉस्पिटमध्ये ठेवण्यात आले आहे.