Aarya Season 3 Trailer: सुष्मिता सेन स्टारर 'आर्या सीझन 3' चा ट्रेलर रिलीज, क्राइम आणि ड्रामाने भरलेली मालिका 3 नोव्हेंबरला होणार प्रदर्शीत

सुष्मिता सेनची सुपरहिट वेब सीरिज आर्याचा तिसरा सीझन लवकरच रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी या मालिकेचा ट्रेलर रिलीज केला आहे, जो खूपच रोमांचक दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच सुष्मिता सेनचे चित्रीकरण होते. यानंतर, मालिकेची कथा पुढे सरकते, ज्यामध्ये आर्या आपले कुटुंब आणि व्यवसाय वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. आर्या सीझन 3 चे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. ही मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर 3 नोव्हेंबर पासून प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन सीझनला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता तिसरा सीझन प्रेक्षकांना तितकाच आवडतो की नाही हे पाहायचं आहे.

पाहा ट्रेलर -