आप आमदाराने विधानसभा परिसरात फाडला स्वत:चा शर्ट, झाले उघडेबंब; रविदास मंदिर तोडल्याचा केला निशेध

हे मंदिर पाडताना दलित समुदयाने त्याला विरोध करत आंदोलन केले. मंदिर तोडल्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक होत आमदार महोदयांनी भावनेच्या भरात दिल्ली विधानसभा (Delhi Assembly) सभागृहात स्वत:चा शर्ट अंगावच फाडला.

Aap Mla Ajay Dutt | (Photo Credits: Twitter)

आम आदमी (Aap) पक्षाचे दिल्ली येथील आमदार अजय दत्त (Ajay Dutt) हे आपल्या वेगळ्याच वर्तनामुळे चर्चेत आले आहेत. दिल्ली येथील तुगलकाबाद (Tughlakabad) परिसरातील रविदास मंदिर बुधवारी (21 ऑगस्ट 2019) पाडण्यात येत होते. हे मंदिर पाडताना दलित समुदयाने त्याला विरोध करत आंदोलन केले. मंदिर तोडल्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक होत आमदार महोदयांनी भावनेच्या भरात दिल्ली विधानसभा (Delhi Assembly) परिसरात स्वत:चा शर्ट अंगावच फाडला.

दक्षिण दिल्ली येथील तुगलकाबाद येथील हे मंदिर सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशावरुन पाडण्या येत होते. न्यायालयीन आदेशावरुन कारवाई करत असताना त्यास प्रचंड विरोध झाला. या कारवाईस विरोध करणाऱ्या समुहाने सुरुवातीला रामलीला मैदानात एक रॅली काढली. त्यानंतर हे आंदोलक रात्री उशीरा तुगलकाबादच्या दिशेने गेले. रामलीला मैदानात या आंदोलकांनी मंदिर तोडण्याच्या कारवाईला विरोध दर्शवला. या आंदोलनाचे नेतृत्व भीम आर्मीचे चंद्रशेखर करत होते. या आंदोलनानंतर चंद्रशेखर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या कितीतर आगोदरपासून गोंधळ सुरु होता.

दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना नुकसान पोहोचवले. तसेच, हातात लाठ्या-काठ्या घेऊन जोरदार प्रदर्शनही केले. आंदोलकांनी काही वाहनांना आग लावल्याची घटनाही घडली. यात काही पोलीसकर्मी जखमी झाल्याची माहिती आहे. या आंदोलनातील सुमारे 91 आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे समजते. या सर्वांवर हिंसा करणे, समाजात गोंधळ निर्माण करणे, खासगी मालमत्तेचे नुकसान करणे असे आरोप आहेत.

दरम्यान, रविदास मंदिर तोडल्यानंतर या परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांसोबतच पॅरा मिलिट्री फोर्स जवानही तैनात करण्यात आले आहेत. मंदिर तोडल्यानंतर त्या परिसरातील एक रस्ता भींत घालून बंद करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif