हरियाणा सरकारकडून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन सोबत करार करत 3-6 वयोगटातील मुलांसाठी प्ले स्कूल सुरु करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सच्या विरोधात लढवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात विजय झाला आहे.

हैदराबाद येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

RJD नेते तेजस्वी यादव यांनी  LPJ प्रमुख चिराग पासवान यांची भेट घेतली आहे.

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 10913 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचा सारासार विचार करून एमपीएससी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. होतकरू विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच हे शासन कार्यरत आहे, हेच या निर्णयातून दिसते, अशा आशयाचे ट्विट ऋतुराज पाटील यांनी केले आहे. ट्विट-

 

सिंधुदुर्ग, पुणे अहमदनगर, नाशिक आणि आसपासच्या भागात पुढील 2-3 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. ट्वीट-

 

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 12134 रुग्ण आढळल्याने आकडा 15,06,018 वर पोहचला आहे.

Fake TRP Ratings Racket प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे CFO यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला आहे.

आसाम: कॉंग्रेसचे आमदार राजदीप गोवला यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कार्यक्रमात सहभागी झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Load More

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे काल (8 ऑक्टोबर) दिल्लीमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रामविलास पासवान यांच्या हृद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि काल निधन झाले. त्यांचा मुलगा चिराग पासवानने निधनाची बातमी ट्वीट केली होती.

दरम्यान भारतामध्ये मागील आठवड्यांपासून सातत्याने नव्या कोरोनाबधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या वाढती आहे. ही भारतासाठी दिलासादायक बातमी आहे.

महाराष्ट्रात कोरोनाशी सामना करत पुन्हा जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यांर्गत रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आजपासून मुंबई-पुणे-मुंबई रेल्वेसेवा सुरू होत आहे तर मध्य रेल्वेकडून 8 इंटरसिटी एक्सप्रेस देखील 11 ऑक्टोबरपासून चालवण्यात येणार आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

मराठा आरक्षणाबाबत राज्यात आंदोलन तीव्र होत असताना आता महाराष्ट्र बंदची हाक मागे घेतली आहे. यंदा रविवार (11 ऑक्टोबर) दिवशी एमपीएससीची परीक्षा आहे. ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.