शहरात नव्याने १,३९० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ६५,९६६ झाली आहे. तर १,८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १५,८१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता ३,१९,५८८ झाली असून आज ६,००८ टेस्ट घेण्यात आल्या

झारखंड येथे आज 530 कोरोनाबाधिचांची नोंद झाली आहे. तर, 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 हजार 156 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

छत्तीसगड येथे आज 285 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

  

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई शहरात आढळून आले आहेत. मुंबईत आज 1 हजार 66 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 48 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला होता. राज्यात आज 12 हजार 248 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 390 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

  

मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

आंध्र प्रदेशात आज तब्बल 10 हजार 820 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 97 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

  

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 987 वर पोहचल्याने आकडा 23903 वर पोहचला आहे.

उत्तराखंड येथे कोरोनाचे आणखी 230 रुग्ण आढळून आल्याने आकडा 9632 वर पोहचला आहे.

मणिपूर येथे कोरोनाचे आणखी 118 रुग्ण गेल्या 24 तासात आढळल्याने आकडा 3753 वर पोहचला आहे.

Load More

देशासह राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट कायम आहे. रुग्णवाढ सातत्याने सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी भर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील चांगली आहे. देशात सध्या 20,88,612 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 6,19,088 अॅक्टीव्ह केसेस आहेत. म्हणजेच 14,27,006 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर कोरोना संसर्गामुळे बळी पडलेल्या मृतांचा आकडा 42,518 इतका आहे.

काही दिवसांवर येऊन ठेपलेला सण म्हणजेच गोकुळअष्टमी. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर होणारा दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या उत्साहावरही कोविड-19 संकटाने पाणी फिरवले आहे. त्यामुळे यंदा गणपती बाप्पाचे आगमन, उत्सव आणि विसर्जन अगदी साध्या स्वरुपात पार पडेल.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान मुंबईतील कोरोनामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले असले तरी मुंबईत बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला 14 दिवस क्वारंटाईन होणे आवश्यक असल्याचे आदेश मुंबई महानगरपालिकाने दिले आहेत. तसंच मुंबईतील नागरिकांना देखील सरकारी सूचनांचे पालन करुन खरबदारी घेणे आवश्यक आहे.