दिल्लीच्या मुंडका परिसरातील एका गोदामात भीषण आग लागली आहे. घटनास्थळी 20 फायर टेंडर्स पोहचले आहेत.

 

'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनें'तर्गत यावर्षी 7 हजार कोटींचा निधी अर्थसंकल्पित. यातून यापूर्वी वितरित केलेला निधी वगळता 1, 306 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत राज्यातील 25.77 लाख खातेदारांना 16,690 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत माहिती दिली. 

'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनें'तर्गत यावर्षी 7 हजार कोटींचा निधी अर्थसंकल्पित. यातून यापूर्वी वितरित केलेला निधी वगळता 1, 306 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत राज्यातील 25.77 लाख खातेदारांना 16,690 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत माहिती दिली. 

पुणे शहरात आज नव्याने 1,147 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यात नायडू-महापालिका रुग्णालये 793, खासगी 338 आणि ससूनमधील 16 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संक्रमितांची संख्या आता 24, 168 इतकी झाली आहे.

निवड प्रक्रिया झाल्यानंतर 151 रेल्वे गाड्या खासगी ऑपरेटरद्वारे चालवल्या जातील. ज्या मार्गांवर सध्याच्या क्षमतेपेक्षा गाड्यांची मागणी जास्त आहे, अशा मार्गांवर या गाड्या धावणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.

ज्येष्ठ अभिनेते जगदीप साहब (मूळ नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी) यांचे 81 व्या वर्षी निधन झाले आहे. चे होते. ते अभिनेता जावेद जाफेरी यांचे वडील होते.

भारतीय लष्कराने आपल्या कर्मचार्‍यांना माहिती बाहेर पडू नये यासाठी, Facebook, TikTok, Truecaller आणि Instagram यासह 89 अॅप्स स्मार्टफोनमधून हटवण्यास सांगितले आहे. यासह Tinder, Couch Surfing  आणि Daily Hunt सारखे डेटिंग अ‍ॅप्स आणि न्यूज अ‍ॅप्सदेखील डिलीट करण्यास सांगितले आहे. भारतीय लष्करातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून भाजप नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांना ठार केले असल्याचे वृत्त मिळत आहे. जम्मू काश्मीर पोलिस प्रमुख दिलबाग सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांनी आपल्या शिक्षेविरोधात आढावा याचिका दाखल न केल्याबद्दल, भारताची प्रतिक्रिया आली आहे. कुलभूषण जाधव यांच्या मायदेशी परतण्यासाठी सर्व योग्य पर्यायांवर विचार करण्यात येईल असे भारताने म्हटले आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा किरकोळ स्वरुपाचा अपघात असून, देवेंद्र फडणवीस पूर्णपणे सुखरुप असल्याचीही माहिती आहे, असे वृत्त महाराष्ट्र टाईमसने दिले आहे.

Load More

कोरोना व्हायरस संकटासोबतच भारतीय सीमारेषांवरील अस्थिरता चिंता वाढवत आहे. जम्मू-काश्मीर मध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांसह सातत्याने चकमकी होत आहेत. त्यातच वारंवार पाकिस्तानकडून हल्ले केले जात आहेत. पुंछ जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यात अजून एक नागरिक जखमी झाला.

दरम्यान कोविड-19 वर ठोस औषध किंवा लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे संकट कायम राहणार आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 719665 वर पोहचला असून त्यापैकी 439948 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 259557 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोना संसर्गामुळे देशात एकूण 20160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचे संकट अद्याप दाट असले तरी अनलॉक 2 च्या माध्यमातून नव्या सुविधा जनतेसाठी खुल्या केल्या जात आहेत. 9 जुलैपासून राज्यातील दुकाने, बाजारपेठा सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली राहणार आहेत. तसंच मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत आता कोविड-19 ची चाचणी करण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नसल्याचे BMC ने स्पष्ट केले आहे.