मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पुण्यात आज 1134 नव्या रुग्णांची भर पडली असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-  

 

राजस्थानमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यात आज 716 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. पीटीआयचे ट्विट- 

   

महाराष्ट्रात 9 जुलैपासून बाजारपेठा, दुकाने अतिरिक्त 2 तास, म्हणजे सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

एलजी पॉलिमर गॅस गळतीच्या घटनेप्रकरणी, आंध्र प्रदेश सरकारने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 2 पर्यावरण अभियंता आणि कारखाना विभागातील एक अधिकारी अशा तीन सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

चंदीगड येथे आज आणखी 7 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ज्यामुळे चंदीगड येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 492 वर पोहचली आहे. यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पीटीआयचे ट्वीट- 

  

बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या कोविड चाचणी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. मुंबईमध्ये यापुढे कोरोना विषाणू चाचणी करून घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज लागणार नाही. एएनआयचे ट्विट- 

  

राज्यात लवकरच पोलीस भरती करण्यात येणार असून, 10 हजार पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

औरंगाबाद शहरातील शिवसेना नगरसेवक नितीन साळवे यांचा कोरोना व्हयरस संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांच्या मृत्यू झाला. एका खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 86132 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 993 कोरोना संक्रमित रुग्ण सापडले. मुंबईत आजघडीला 60114 रग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58137 इतकी आहे.

राज्यात आज दिवसभारत 5134 नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले. 3296 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर 224 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 2,17,121 इतकी झाली आहे. त्यात उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून सुट्टी मिलालेल्या 1,18,558 जणांचाही समावेश आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमनामुळे 9250 जणांचे मृत्यू झाले आहेत. तर राज्यात आजघडीला 89,294 कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Load More

महाराष्ट्रामध्ये अजूनही कोरोनाचा कहर सुरूच आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2,11,987 वर पोहचली आहे. मुंबईमध्ये कोरोना फैलावाचा दर मंदावत असला तरीही आता ठाणे, पुणे, औरंगाबाद येथील परिस्थिती चिंता करणारी आहे. नुकतीच पुण्यामध्ये एका 60 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाने क्वारंटीन सेंटरमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोंढवा येथे त्यांच्यासह मुलगा कोरोनाबाधित आढळल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

काल केंद्र सरकारने विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायला गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात रद्द झालेल्या विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय असल्याने आता अधून मधून त्याच्या जोरदार सरी बरसत आहेत. पुढील काही दिवस मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर कमी असेल परंतू कोकणामध्ये मात्र अजूनही जोरदार सरी पुढील 2-3 दिवस बरसणार असल्याची माहिती हवामान वेधशाळेने दिली आहे.