आनंदवार्ता! 2020 मध्ये देशात होणार सहा AIIMS; महाराष्ट्रासह या राज्यांचा समावेश
AIIMS (Photo Credits: Wiki Commons)

नवीन वर्षात देशात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. मग हे अर्थव्यवस्थेबद्दल असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील. या बदलांसोबत भारतात आणखी एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे 2020 मध्ये देशात 6 नवीन एम्स सुरु होणार आहेत. यात 2 उत्तर प्रदेश, 1 पश्चिम बंगाल, 1 महाराष्ट्र (Maharashtra), 1 पंजाब (Punjab) आणि 1 आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) असतील. AIIMS हे देशातील उत्कृष्ट दर्जाचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान असेल. येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. नवी दिल्लीत हे AIIMS रुग्णालय आहे. मात्र आता ही सेवा देशाच्या अन्य महत्वाच्या ठिकाणी सुरु होणार आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेली व गोरखपूर या दोन ठिकाणी एम्स बनवण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. आंध्र प्रदेशातील मंगलगिरीत तर महाराष्ट्रातील नागपूरमध्ये हे बनवण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील कल्याणी, व पंजाबमधील बठिंडामध्ये यावर्षी AIIMS तयार होतील असे सांगितले जात आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2020 मध्ये सर्वात आधी पहिले एम्स उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये सुरू करण्यात येईल. या एम्ससाठी जवळपास 1011 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एप्रिलमध्ये गोरखपूर कार्यरत होईल. गोरखपूर हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे.

जूनमध्ये रायबरेली व बठिंडामध्ये एम्स सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात बठिंडा एम्समध्ये 11 प्रकारची ओपीडी सुविधा आणि जनरल शस्त्रक्रिया सुविधा करण्यात आली आहे.

यासोबतच 2020 च्या या नव्या वर्षात खासगी क्षेत्रात उमेदवारांना तब्बल 7 लाख नोकऱ्यांची संधी उलब्ध होणार असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहेत. देशाची अर्थव्यवस्था आता सुरळीत मार्गावर येण्यास सुरुवात झाली असल्याने नोकरीची संधी सुद्धा आता चालून येणार आहे. MyHiringClub.com आणि Sarkari-Naukri.info यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक खासगी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार असल्याचे म्हटले आहे.