IPL 2020: दुबईमध्ये चालू असलेल्या आयपीएलच्या आजच्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 59 धावांनी पराभूत केले.

 

तेलंगणा: रंगा रेड्डी जिल्ह्यात आज एका लॉरी कंटेनरमधून 1.3 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा 1010 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे.

महाराष्ट्र: पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपचे चार नगरसेवक आणि काही कार्यकर्त्यांना पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पुणे येथील कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये, पाकिस्तानकडून झालेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनात भारतीय लष्कराच्या एका कनिष्ठ कमिशनर अधिकाऱ्याने आपला जीव गमावला.

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,813 रुग्णांची व 47 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या शहरामध्ये 24,199 सक्रीय रुग्नानांवर उपचार सुरु आहेत. शहरामधील एकूण मृत्यूंची संख्या 9,152 वर पोहोचली आहे- बीएमसी

मुंबईतील गोरेगाव येथे एका 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशात गेल्या 4 महिन्यांपासून दलित महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 10,244 रुग्ण आढळले असून 263 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 14,53,653 वर पोहचला आहे.

रत्नागिरी येथे कोरोनाचे आणखी 55 नवे रुग्ण गेल्या 24 तासात आढळले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  'The Responsible AI for Social Empowerment (RAISE 2020)' साठी वर्च्युअली समिटला सुरुवात झाली आहे.

Load More

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. दिवसेंदिवस हा विळखा अधिक घट्ट होताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे लाखो लोकांचा जीव गेला असून अनेकांची कोरोनाविरोधातील लढाई सुरू आहे. अशात आता भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा संख्या 65 लाखाहून अधिक झाली आहे. तसेच सध्या 9 लाखाहून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय 10 लाखाहून अधिक जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर काँग्रेसने पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिलं आहे. अशातचं बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच असल्याचं एम्सच्या (AIIMS) अहवालातून समोर आलं आहे. यावरून शिवसेनेने आता अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधला आहे. एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? असा सवास शिवसेने सामनामधून केला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

सुशांतच्या मृत्यूनंतर ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा सवालदेखील शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.