Coronavirus Outbreak in India: गोदन एक्सप्रेस मधून मुंबई ते जबलपूर प्रवास करणारे 4 प्रवासी कोरोनाग्रस्त
Coronavirus Outbreak in India | (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरसने देशात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच आणखी नव्या रुग्णांची माहिती समोर येत आहे. गोदन एक्सप्रेस (Godan Express) ट्रेन (Train 11055) मधून मुंबई (Mumbai) ते जबलपूर (Jabalpur) प्रवास करणारे 4 प्रवासी कोरोनाग्रस्त असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निर्दशनास आले आहे. गेल्याच आठवड्यात ते दुबईहून (Dubai) परतले होते. या रुग्णांनी प्रवास केल्याने आणखी काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाली असण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांना आवश्यक कारवाई करण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशात कोरोना बाधित एकूण 271 रुग्ण आहेत. ही संख्या वाढू नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. तसंच नागरिकांच्या सतर्क राहून सहकार्य करण्याचे आवाहन सरकारकडून केले जात आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमातळावरच तपासणी केली जात आहे. तसंच रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास त्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. (अमेरिका, जर्मनी मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष सोय; मदतकेंद्रांची यादी जाहीर)

ANI Tweet:

प्रवास टाळा, गर्दीची ठिकाण टाळा, असे आवाहन सरकारकडून सातत्याने होत आहे. मात्र नागरिकांकडून होणारा निष्काळजीपणा यामुळे चिंता अधिक वाढते. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत उद्या देशात 'जनता कर्फ्यू' लागू करण्यात येणार आहे.