अरबाज खान, सोहेल खान आणि निर्वाण हे दुबईतून आल्याने हॉटेलमध्ये क्वारंटाइन होण्यास सांगित ले असता त्यांनी  नियमांचे उल्लंघन करत घरी परतल्याने त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना वूडलँन्ड  रुग्णालयातून येत्या बुधवारी डिस्चार्ज देण्याचा  विचार केला जात आहे.

पाँडेचेरी येथे येत्या 6 जानेवारी पासून टेक्निकल महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत.

पश्चिम बंगाल येथील गंगासागर मेळाव्यात गर्दी न करता लोकांनी जावे असे  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकांना आवाहन  केले आहे.

हरियाणा सरकार इयत्ता 8 वी ते 12 चे पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी 8.20 लाख इलेक्ट्रॉनिक्स टॅबलेट्ससह अभ्यासाचे साहित्य राज्यातील शाळांना पुरवणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज सकाळी गांधीनगरमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. ट्विट-

 

उत्तर प्रदेशातील शामली येथून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक  केली असून  191kg चरस जप्त  करण्यात आले आहे.

कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारी हिला MD ड्रग्ज प्रकरणी आज एनसीबीकडून अटक  करण्यात आली आहे.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने अभिनेता सोहेल खान, त्याचा मुलगा निरवाण आणि अरबाज खान याच्या विरोधात महापालिकेने  FIR दाखल केला आहे.

येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

Load More

राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका आता बराच कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील स्थिती बऱ्याच अंशी पूर्वपदावर येऊ लागली आहे. असे असले तरी शाळा-महविद्यालयांबाबत अद्यापही स्पष्टता नाही. काही ठिकाणी सुरु तर काही ठिकाणी बंद... काही ठिकाणी ऑनलाईन अशा चक्रात राज्याचा शिक्षण विभाग अडकला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी (3 जानेवारी 2020) महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा येत्या 15 एप्रिलनंतर आणि इयत्ता 10 वीची परीक्षा 3 मे नंतर घेण्याचा प्रयत्न असणार आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन आज 40 व्या दिवशीही सुरुच आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जाचक असलेले कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलनावर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत अनेकदा चर्चा केली आहे. या आधी 6 वेळा केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली आहे. परंतू, तोडगा निघाला नाही. आज या चर्चेची सातवी फेरी पार पडत आहे. आशा आहे की केंद्र सरकारला आज तरी सूर गवसेल आणि शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासचा मार्ग सापडेल. आजच्या बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

कोरोना व्हायरस लस निर्मिती होत आहे. भारताने 'सीरम इन्स्टिट्यूट' निर्मित 'कोव्हिशिल्ड' आणि भारत बायोटेक निर्मित 'कोव्हॅक्सिन' लसीच्या आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, देशभरात लस नेमकी कशी पोहोचणा आणि त्याचे वितरण कसे होणार याबबत उत्सुकता आहे.

दरम्यान, नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु होत आहेत. प्रामुख्याने इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरु होत आहे. सोशल डिस्टंन्सींग आणि इतर नियमांचे पालन करुन शाळा सुरु होत आहेत. परंतू, पालकांचे संमतीपत्र घेतल्यानंतरच आणि तंदुरुस्त असलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे.

दरम्यान, राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.