आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे भाजपा नेत्या इमरती देवी यांच्यावर 1 दिवसाची बंदी; 31 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

01 Nov, 05:04 (IST)

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे, निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशमध्ये 1 नोव्हेंबर रोजी निवडणुकांच्या संदर्भात सार्वजनिक सभा, सार्वजनिक मिरवणुका, रोड शो आणि मुलाखती, माध्यमांमध्ये जाहीर भाषण अशा गोष्टींसाठी भाजपा नेत्या इमरती देवी यांना बंदी घातली आहे.

01 Nov, 04:23 (IST)

हिमाचल प्रदेश: चोपलच्या मध्याना येथे आज पहाटे दुमजली इमारतीला भीषण आग लागली आहे.  यात कोणतीही जीवीतहानी न झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विट-

 

01 Nov, 04:09 (IST)

जहाज मंत्रालयाच्या प्रस्तावावर राजीव जलोटा यांना कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

01 Nov, 03:54 (IST)

देशातील भाजीपाला आणि इंधनांच्या वाढत्या किंमतींबाबत आप कार्यकर्त्यांनी नोएडामध्ये निदर्शने केली, महागाई रोखण्यासाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा हस्तक्षेप त्यांना अपेक्षित आहे.

01 Nov, 03:24 (IST)

1 नोव्हेंबरपासून मुंबईत 610 अधिक दैनंदिन विशेष उपनगरी सेवा चालवल्या जातील व अशाप्रकारे एकूण सेवा 2020 पर्यंत नेण्यात येतील. यामुळे सामाजिक अंतर कायम राखण्यास, जास्त गर्दी टाळण्यास आणि प्रवाशांची सोय वाढविण्यात मदत होईल. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली.

01 Nov, 03:22 (IST)

मध्य प्रदेशातील सिवनी येथे आज सायंकाळी 6.16 वाजता 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपशास्त्र राष्ट्रीय केंद्र यांनी याबाबत माहिती दिली.

01 Nov, 02:54 (IST)

महाराष्ट्र: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) अधिकाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्या लोकांसाठी अजब शिक्षा शोधून काढली आहे. अधिकारी अशा लोकांकडून स्वच्छताविषयक कामे करवून घेत आहेत.

01 Nov, 02:31 (IST)

दिल्ली सरकारकडून विवाहसोहळ्यासाठी 200 जणांच्या कमाल मर्यादेची परवानगी देण्यात आली आहे.

01 Nov, 02:01 (IST)

आज मुंबईमध्ये 999 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या नव्या भरीमुळे मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 2,27,822 इतका झाला असून त्यापैकी 2,27,822 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 10,250 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 18,753 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

01 Nov, 01:27 (IST)

नालासोपारा परिसरातील थर्माकोल कारखान्यात भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. दरम्यान, बचावकार्य अद्याप सुरु आहे.

01 Nov, 01:00 (IST)

राज्यात आज 5,548 नव्या रुग्णांची भर पडली असून 74 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16,78,406 वर पोहचला आहे. त्यापैकी 15,10,353 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 43,911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1,23,585 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

01 Nov, 24:39 (IST)

RCB vs SRH, IPL 2020: सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

01 Nov, 24:12 (IST)

अभिनेत्री दीपिका पादुकोण ची मॅनेजर करिश्मा प्रकाश ने मुंबईतील NDPS कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. NCB कडून करिश्मा प्रकाश हिला समन्स बजावण्यात आला होता. मात्र ती चौकशीसाठी उपस्थित राहली नव्हती.

31 Oct, 23:46 (IST)

जेम्स बाँड अभिनेता Sir Sean Connery यांचे 90 व्या वर्षी निधन झाले आहे. अशी माहिती युके मीडियाने दिली आहे.

31 Oct, 23:20 (IST)

आंध्र प्रदेश मध्ये आज 2,783 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 8,23,348 वर पोहचली आहे. त्यापैकी 24,575 अॅक्टीव्ह रुग्ण असून  7,92,083  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मृतांचा आकडा 6,690 इतका झाला आहे.

31 Oct, 22:35 (IST)

पश्चिम बंगाल: कोलकाताच्या बैष्णबाघाता टाउनशिप भागात मूर्तीच्या गोदामात आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

 

31 Oct, 22:23 (IST)

भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा हाजीपुरात रोड शो. पहा व्हिडिओ

 

31 Oct, 21:59 (IST)

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 27 वर्षीय सीआरपीएफ जवानाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 

31 Oct, 21:35 (IST)

मिझोराममध्ये आज 28 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे तेथील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,722 इतकी झाली आहे.

31 Oct, 21:29 (IST)

सुप्रिया सुळे यांनी चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

Read more


देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरात जवळपास 60 टक्के घट झाली आहे. परंतु, दिवाळी आणि थंडीच्या दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. देशभरात 80 लाखहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या क्रेनचा अपघात झाला. या अपघातात क्रेनचे दोन भाग झाले आहेत. तसेच क्रेनचा एक भाग पडून बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अनिल बैजल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now