दहशतवादी हल्ले आणि रेल्वे स्थानकांवरील अपघात टाळण्यासाठी उभी राहणार 3,000 किमी लांबीची बाऊंड्रीवॉल
Indian Railways | (Photo credit: file photo)

देशात दहशतवादी हल्ल्यासाठी नेहमीच रेल्वे स्थानके निशाण्यावर असतात. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर रेल्वे स्थानकांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. आता देशातील 202 रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकार महत्वाची योजना आखत आहे. रेल्वे सुरक्षा तसेच रेल्वे स्थानकावर होणारे अपघात टाळण्यासाठी सरकार सुमारे 3,000 किमी लांबीची बाऊंड्री वॉल (Boundary wall) तयार करणार आहे. अरुण कुमार, रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) डीजी यांनी याबाबत माहिती दिली. अनेक स्थानकांवर याचे कामही सुरू झाले आहे. ही भिंत तयार झाल्यानंतर, स्थानकांमध्ये खुल्यारीतीने प्रवेश करणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे.

रेल्वेमार्गाच्या रुळांच्या बाजूला बांधल्या जाणा या भिंतीची उंची 2.7 मीटर असेल. अमृतसरमधील अपघातानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा निर्णय घेतला होता. अमृतसरमध्ये झालेल्या अपघातात 62 लोकांचा मृत्यू झाला होता. कित्येक पावल उचलूनही, स्थानकांवरील मर्यादित प्रवेश सुरक्षेचे आव्हान कायम आहे. यासाठी देशातील 202 रेल्वे स्थानकांचे सर्वेक्षण केले गेले. ईशान्य रेल्वेमध्ये गोरखपूर, लखनऊ आणि छपरा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर प्रवेशाचे खुले क्षेत्र बंद करण्यासाठी 3 हजार कि.मी. लांबीची भिंत बांधावी लागणार आहे. (हेही वाचा: सणासुदीच्या काळात ख्रिसमसपर्यंत धावणार 200 जादा गाड्या; पहिल्यांदा उपलब्ध होणार 'या' सुविधा- रेल्वेचा निर्णय)

यासोबतच, रेल्वे तिकिट दलालीचे रॅकेट उधळून लावण्यासाठी आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. यात आयआरसीटीसी आणि सॉफ्टवेअर फर्म क्रिप्सच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरपीएफने गाड्यांच्या स्कोर्टची पद्धत बदलली आहे. यामुळे आर्म चेन खेचण्याच्या घटनांमध्ये 18 टक्क्यांनी घट झाली आहे.