राजस्थान रॉयल विरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोलकाता नाईट राईडर्सचा फलंदाज शुममन गिलचे सचिन तेंडूलकर यांनी केले आहे. राजस्थान विरुद्ध सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली आहे, असे सचिन तेंडूलकर म्हणाले आहेत. ट्विट-

 

 आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 12 व्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सने राजस्थान रॉयलवर 37 धावांनी विजय मिळवला आहे.  

जम्मू-काश्मीर प्रशासनाने कोविड-19 मुळे कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 8 ऑक्टोबरपर्यंत वाढविले आहे. अधिकृत प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली.

अंदमान आणि निकोबार येथे आज 14 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 हजार 835 वर पोहचली आहे. ट्विट-

  

केंद्राच्या कृषीविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार आहे, अशी महिती समोर आली आहे. ट्विट-

 

कोरोनाची लागण होऊन  मरण पावलेल्या रुग्णांची संख्या दशलक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. ट्विट-

  

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 18,317 रुग्ण आढळले असून 481 जणांचा बळी  गेला आहे.

भारत सरकारकडून सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, ट्रेनिंगसाठी स्विमिंग पूल पुन्हा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

भारत सरकारकडून सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, ट्रेनिंगसाठी स्विमिंग पूल पुन्हा सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

भारतातील कंन्टेंटमेंट झोनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर लॉकडाऊन येत्या 31 ऑक्टोंबर कायम राहणार असल्याचा सरकारचा निर्णय घेतला आहे.

Load More

ठाणे पश्चिम येथील एका कंपनीच्या ऑफिसला आग लागल्याची घटना समोर येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यात जीवित आणि वित्तहानी झालेली नाही.

दरम्यान, बाबरी मशीद प्रकरणात लखनऊमधील विशेष सीबीआय कोर्टाने सर्व 32 आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. तसंच सुनावणी दरम्यान कोर्टाच्या आवारात कडक सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.

आज अनलॉक 4 चा शेवटचा दिवस असून ऑक्टोबर महिन्यापासून अनलॉक 5 ला सुरुवात होईल. अनलॉक 5 च्या टप्प्यात नेमक्या कोणत्या सुविधा सुरु होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत रेल्वेसेवा सुरु होणार असल्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तसंच या महिन्यात नवरात्रौत्सव असल्याने त्यासाठीची नियमावली राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे. अजूनही कोरोना व्हायरस संसर्गावर ठोस लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे अनलॉक 5 च्या माध्यमातून नव्या सेवा-सुविधा सुरु करण्यास मुभा देण्यात आली तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.