काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालच्या बिलालाबाद भागात एनकाउंटर सुरू झाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दल हे त्यांचे काम करत आहेत.

मागील 24 तासांत मुंबईत 903 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 77,197 वर पोहोचला आहे. शहरातील मृतांचा आकडा 4, 554 झाला आहे. तसेच 24 तासांत 654 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 44, 170 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अभिनेत्री संजना सांघी यांची आज चौकशी केली गेली. एएनआयचे ट्विट- 

 

उद्यापासून रेल्वे मुंबईतील 350 लोकल गाड्या वाढवत आहे. राज्य शासनाने नमूद केलेल्या, केंद्र, आयटी, जीएसटी, कस्टम, टपाल, राष्ट्रीयकृत बँका, एमबीपीटी, न्यायपालिका, संरक्षण आणि राजभवनाच्या कर्मचार्‍यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना यातून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.

कोरोना महामारीमुळे पीपीई किट्सच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. आता देशाच्या उत्पादन क्षमतेचा विचार करता सरकारने काही अटींच्या आधारे निर्यातदारांना दरमहा 50 लाख युनिट्सची निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. अतिरिक्त महानिदेशक विदेश व्यापार कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

 

टोळ हल्ल्यांचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाने, Mi-17 हेलिकॉप्टर्सवर यशस्वीरित्या एअरबोर्न टोळ नियंत्रण यंत्रणा तयार केली आणि विकसित केली आहे. हवाई दलाने विकसित केलेल्या या यंत्राद्वारे एकाच वेळी 750 हेक्टर क्षेत्रावर कीटकनाशक फवारणीस मदत होऊ शकते. भारतीय वायु सेनाने याबाबत माहिती दिली.

शरद पवारांनी संरक्षण मंत्रिपदाच्या काळात चुका दुरुस्त करायला हव्या होत्या, अशी टिका काँग्रेस आमदार  नितीन राऊत यांनी केली आहे.

 

महाराष्ट्रात आज 245 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 4878 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,74,761 वर पोहोचली आहे.

 

राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडून पदभार स्वीकारला.

 

पश्चिम बंगालमध्ये आज 652 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Load More

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 जून) संध्याकाळी 4 वाजता भारतीयांना संबोधित करणार आहेत. दरम्यान या 1 जुलै पासून देशात अनलॉक 2 आणि लॉकडाऊनचा सहावा टप्पा सुरू होत आहे. महाराष्ट्र, दिल्ली मध्ये आता वाढती कोरोनाबाधितांची संख्या सरकारचा पुढील प्लॅन काय असेल याबद्दलही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. सोबतच काल सुमारे 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली आहे. यामध्ये हॅलो, टिक टॉक सारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

दरम्यान मुंबईमध्ये कोरोनाचं संकट घोंघावत असताना आता मान्सूनसाठी देखील मुंबईकर सज्ज होत आहेत. काल रात्री झालेल्या धुव्वाधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

केंद्र सरकारने काल अनलॉक 2 च्या देखील गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये नागरिकांना रात्री 10 ते पहाटे 5 चा कर्फ्यू लागू असेल. यापूर्वी तो 9 पासून लागू होता. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात नागरिकांना 31 जुलै पर्यंत काही गोष्टींमध्ये मुभा मिळेल तर काही नियम कडक पाळावे लागणार आहेत.