मुंबईत कोरोनामुळे आज 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोना संसर्गात आजपर्यंत नोंद झालेल्या मृत्युंमधील ही सर्वात कमी संख्या आहे. त्यामुळे धारावी पाठोपाठ आता संपूर्ण मुंबईत MissionZero यशस्वी करूया असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

मल्याळम कवी आणि गीतकार अनिल पानचूरन यांचे आज तिरुअनंतपुरम येथील रुग्णालयात कोविड 19 चा उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर निधन झाले आहे. ट्वीट-

 

आसामच्या Karbi Anglong भागात रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी  भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टेर स्केल इतकी होती.

मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 3 रुग्ण दगावले. कोरोना रुग्णांचा आजचा मृत्यूदर हा सर्वाधिक कमी असल्याचे पाहून मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी कोविड योद्धांसह संपूर्ण जनतेचे आभार मानले. तसेच डॉक्टर, कर्मचारी आणि सकारात्मक बातम्या पोहोचविणा-या मिडियाला देखील सलाम केला.

हरयाणा मध्ये मागील 24 तासांत 450 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत एकूण 2 लाख 57 हजार 261 रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,63,068 इतकी झाली आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये 67 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 55,686 वर पोहोचली आहे. तसेच मागील 24 तासांत 433 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 52,876 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

ब्राझील येथे कोरोनामुळे आणखी 314 जणांचा बळी गेल्याने आकडा 195,725 वर पोहचला आहे.

मुंबईत कोरोनाचे आणखी 581 रुग्ण आढळले असून 3 जणांचा बळी  गेला आहे.

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 715 रुग्ण आढळल्याने आकडा 2,47,228 वर पोहचला आहे.

भारत बायोटेकला COVAXIN लस तयार करण्याच्या परवानाला DCGI कडून परवानगी दिली गेली आहे.

Load More

आज 3 जानेवारी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती. त्यांच्या जयंती निमित्त शिक्षिका, कवयित्री आणि समाजसुधारक असलेल्या सावित्रीबाईंच्या चरणी विनम्र अभिवादन. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य लक्षात घेत सावित्रीबाई यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. अलिकडचे राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

कालच देशभरात कोविड-19 लसीची ड्राय रन पार पडली. Drugs Controller General of India कडून मंजूरी मिळाल्यानंतर लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल. दरम्यान, "पहिल्या टप्प्यातील देशातील 1 कोटी आरोग्य सेवकांना आणि 2 कोटी कोरोना योद्धांना कोविड-19 वरील लस मोफत देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. विशेष म्हणजे Drugs Controller General of India आज सकाळी 11 वाजता कोविड-19 लसीबद्दल प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. यामुळे लसीबद्दल लवकरच मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

लसीकरण मोहीम बूथ स्तरापर्यंत नियोजित निवडणूक प्रक्रियेवर आधारित आहे. 719 जिल्ह्यांमधील 57,000 हून अधिक सहभागींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. हर्षवर्धन यांनी आतापर्यंत 96,000 लोकांना लसीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.