बिहारच्या मुजफ्फरपुरच्या श्री कृष्णा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाला एन्सेफलायटीस सिंड्रोम (एईएस) ची लागण झाली आहे. गेल्या वर्षी मुझफ्फरपूरमध्ये एईएसमुळे 140 पेक्षा जास्त मुलांचे मृत्यू झाले होते.

जगात इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. आज या देशात एका दिवसात जवळपास 1000 मृत्यूंची नोंद झाली आहे, जी एका दिवसातील सर्वाधिक आहे.

पाकिस्तानी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या 1,300 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यामध्ये सिंधमध्ये 441, पंजाबमध्ये 427 आणि बलुचिस्तानमध्ये 131 आहेत. या विषाणूमुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर यातून 23 जण बरे झाले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूमुळे आज 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे राज्यात झालेला हा 5 वा मृत्यू आहे.

 घरात बसून लॉकडाउन पूर्ण करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. तसेच गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालू नका. या परस्थितीचा सामना स्वयंशिस्तीने करा असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबईकरांना आता तात्पुरत्या आवश्यक आणि आपत्कालीन सेवांसाठी ऑनलाईन ई-पास फॉर्म भरून सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

मुंबईतील खासगी रुग्णालयात कोरोना संशयित एका 85 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पटना येथे ऑनड्युटी पोलिसांकडून बटाट्याची वाहतूक करण्याऱ्या तरुणासोबत गैरव्यवहार केल्याने अटक करण्यात आली आहे. सदर पोलिसांनी तरुणावर गोळीबार आणि मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

माजी केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांचे निधन झाले आहे.

NEET ची परिक्षा पुढे ढकलल्याची माहिती MHRD यांनी दिली आहे.

Load More

कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतात पसरत जाणारा फैलावामुळे देशातील स्थिती अत्यंत चिंताजनक बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात असून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे 14 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून अंदमान-निकोबार (Andaman-Nicobar) मध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाने या अंदमान मध्ये आढळलेल्या पहिल्या रुग्णासोबत प्रवास केला होता. ही खूप चिंताजनक बाब असून या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे माहिती अंदमान-निकोबार चे प्रधान सचिव चेतन सांघी यांनी माहिती दिली आहे.

भारतात आतापर्यंत 694 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 43 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 130 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

जगभरात संचारबंदी लागू करण्यात आल्या नंतर या संदर्भात लोकांशी संवाद साधण्याकरिता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह करणार आहेत. संचारबंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्रातील स्थिती, कोरोना विरुद्धचा पुढील लढा कसा असेल याबाबत ते माहिती देतील.