येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूया. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची. मूर्ती ४ फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूया. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची. मूर्ती ४ फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. आज देशात 15,802 अधिक रुग्णांची नोंद झाली यासह भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 506,972 वर पोहचला आहे. 

देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. आज देशात 15,802 अधिक रुग्णांची नोंद झाली यासह भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 506,972 वर पोहचला आहे. 

मुंबईत आज एकूण 1,297 कोरोना संक्रमित रुग्ण आणि 44 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 72,287 वर पोहचली असून मृतांचा आकडा 4,177 वर पोहचला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी राज्यभरातून कोविड-19 प्रकरणे येत असल्याने कोरोना व्हायरसचे सामुदायिक प्रसारण सुरू झाले असल्याचे मान्य केले आहे. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे कंटेनमेंट झोनसाठी  29 जून ते 5 जुलै पर्यंत असा 7 दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. 

मुंबईतील प्रसिद्ध ‘गिरगावचा राजा’ मंडळाने यंदा 21 फुटाची गणेश मुर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला असून यंदा मंडळाने छोट्या मुर्तीची विधिवत पुजा करुन भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
#girgaoncharaja #stayhome #staysafePosted by Nikadwari Lane Sarvajanik Ganeshotsav Mandal (गिरगांवचा राजा) on Thursday, 25 June 2020

झारखंड सरकारने 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. राज्यात कोरोना व्हायरस संक्रमितांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारने महत्वपूर्व निर्णय घेतला आहे. 

दिल्लीत आज 3,460 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली असून, राज्यात एकूण संक्रमितांची संख्या 77,000 वर पोहचली आहे असून आजवर 2,492 मृत्यूची नोंद झाली आहे: अधिकारी

Load More

भारतामध्ये एकीकडे कोरोनाचं संकट दाट होत असताना आता सीमेवर अतिरेकी दहशतवाद्यांचादेखील भारतीय जवानांना सामना करावा लागत आहे. दरम्यान आज अवंतिपोरा परिसरामधील त्राल मध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यामध्ये लष्कराला यश आलं आहे. दरम्यान जम्मू कश्मीरमध्ये आज या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती जम्मू कश्मीर पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान उत्तर भारतामध्ये वाढता कोरोनाचा कहर पाहता आता नोएडा, मीरत, गाझियाबाद, मुझफ्फर नगर या परिसरामध्ये संचारबंदीचे नियम बदलण्यात आले आहेत. आता या भागात रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल. याकाळात नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मास्क शिवाय व्यक्ती फिरताना दिसल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकताना दिसल्यास त्याला कडक शिक्षा , दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती मीरत डिव्हिजनल कमिशनर यांनी दिले आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान दिवसागणिक भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढत आहे. भारतात (India) कोरोना बाधितांची (Coronavirus Positive) एकूण संख्या 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचली असून एकूण 14,894 वर पोहोचली आहे.