पाकिस्तान मध्ये अडकलेले 748 भारतीय शनिवार पर्यंत पुन्हा भारतात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात 28 जून पासून सुरु होणाऱ्या सलून्स साठी आज राज्य सरकारद्वारे नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत 725 नवीन कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 16 मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण सकारात्मक प्रकरणे 18240 झाली असून, मृतांचा आकडा 655 झाला आहे.

देशभरातील नियमितपणे धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्या आणि उपनगरीय लोकल सेवा १२ ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या काळात प्री-बुकींग झालेल्या तिकीटांचे पैसे परत करण्यात येणार आहेत.

दिल्लीत कोविडची अवस्था महाराष्ट्रापेक्षा वाईट आहे. आम्ही न्यूयॉर्क आणि इतर ठिकाणी स्पर्धा करीत आहोत, जिथे परिस्थिती खरोखरच वाईट होती. दिल्लीत राज्य शासनाने दारू विक्रीस परवानगी दिली आहे. ज्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे, ते आम्ही पाहिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळता आली नाही, असे भाजप खासदार मीनाक्षी लेखी म्हणाल्या आहेत. एएनआयचे ट्विट- 

 

मुंबईत आज कोरोना व्हायरसचे 1,365 रुग्ण आढळले आहेत याशिवाय  58 मृत्यूची नोंद झाली आहे. आज घडीला शहरातील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या वाढून 70,990 आणि मृत्यूची संख्या 4,060 वर पोहोचली आहे.

गोवा येथे आज कोरोनाचे 44 नवे रुग्ण आढळले असून  कोरोनाबाधितांचा एकूण एकदा 995 वर पोहचला आहे. यापैकी 658 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.  335 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज राज्यात एकूण 4841 नवे रुग्ण,192 मृत्यू नोंदवले गेले आहेत. यासोबतच आज 3661 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या ऍक्टिव्ह केस आता 63342 वर पोहचला आहे. आजवर 6931 जणांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यात 4.69% मृत्यू दर आहे.

बिहार मधील गोपाळगंज येथे आज वीज कोसळून 83 जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या कुटुंबियांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चार लाखाची मदत घोषित केली आहे. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काही वेळापूर्वी या मृतांना श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्रात आज 3661 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, आजवर राज्यात 77,453 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. राज्य आरोग्य विभागातर्फे याविषयी माहिती देण्यात आली आहे.

Load More

एकीकडे देश कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus) गंभीर विषाणूशी लढत असताना दुसरीकडे आग लागल्याच्या घटनांना देखील उधाण आले आहे. अशातच मुंबईतील नरीमन पॉईंट Nariman Point) परिसरात असलेल्या एका बँकेला (Bank) आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या आगीत किती वित्तहानी झाली आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

तर दुसरीकडे देशात कोरोना व्हायरसचा विळखा कायम असून अनलॉक 1 च्या आधारावर हळूहळू लॉकडाऊनमधील नियम हळूहळू शिथील करण्यात येत आहेत. त्यामुळ आज सकाळी नवी दिल्लीत अनेक लोक जॉगिंग करताना दिसले. तसेत नवी दिल्लीत पेट्रोल डिझेल च्या दरात आजही भाववाढ कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या दरानुसार नवी दिल्लीत पेट्रोल 0.16 पैशांनी वाढले असून 79.92 प्रतिलीटर इतके झाले आहे. तर डिझेल 0.14 पैशांनी वाढले असून 80.02 प्रति लीटर इतके झाले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 लाख 56 हजार 183 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 14,476 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत 2,58,685 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्या पाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.