भीमा कोरेगाव प्रकरण: भायखळा कारागृह अधिकाऱ्यांनी सुधा भारद्वाजच्या तिच्‍या जामिनावरील सुनावणीसंदर्भात, तिचे प्रकृती अहवाल सादर केले. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिला इस्केमिक रोग आणि मधुमेहाचा त्रास आहे. तुरूंगात तिला औषधे पुरवली गेली आहेत व तिची प्रकृती स्थिर आहे.

बिहारमधील पुरामुळे 7,65,191 लोक प्रभावित झाले असून, 13,877 लोक निवारा गृहात राहत आहेत. राज्यात एनडीआरएफ (NDRF) 21 पथके राज्यात तैनात करण्यात आली आहेत. बिहार सरकारने याबाबत माहिती दिली.

बॉलिवूडचे पाकिस्तानातील काही माफियांशी संबंध असल्याचा आरोप भाजपच्या एका नेत्याने केला होता. यावरुन सुरु झालेल्या चर्चेबाबत विचारले असता या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करु. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार आणि प्रशासनाने संकेत दिल्याप्रमाणे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. उद्यापासून पुणे लॉकडाऊन मुक्त असणार आहे. मात्र, लॉकडाऊन मुक्त याचा अर्थ सर्व काही सुरु आणि पूर्ववत असा नव्हे. राज्य शासनाने घालून दिलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तसे जाहीरही केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर नेहमीप्रमाणेच मर्यादा असणार आहेत. काय आहेत हे निर्बंध आणि काय, कसे आणि कोणत्या वेळात सुरु, बंद घ्या जाऊन..

दिल्लीतील केअर सेंटरमध्ये 14 वर्षाच्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या मुलीवर दुसर्‍या एका रुग्णाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पुणे शहरात आज नव्याने 1, 599 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह पुणे शहरातील एकूण संख्या आता 44,065 इतकी झाली आहे.

जालना शहरातील कोरोना व्हायरस रुग्णालयात सेवा देणार्‍या सर्वोत्कृष्ट फ्रंटलाइन वर्कर्सना दर आठवड्याला प्रमाणपत्र, रोख बक्षीस मिळणार आहे. जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनही माहिती दिली.

पश्चिम बंगाल येथे कोरोनाचे आणखी 2436 रुग्ण आढळून आले असून 34 जणांचा बळी गेला आहे.

Dr Zakir Hussain Madarsa Modernisation Scheme अंतर्गत महाराष्ट्रातील 121 मदरसा शिक्षकांसाठी 1.80 कोटी रुपये वितरित करण्यात येणार असल्याचा निर्णय अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक  यांनी स्पष्ट केले आहे.

मध्य प्रदेशात कोरोनाचे आणखी 632 रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा बळी गेला आहे.

Load More

देशाला त्रस्त करणारे कोरोना व्हायरस संकट अद्याप कायम आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित मोठी भर पडत असल्याने सामान्य नागरिकांमधील अस्वस्थता देखील वाढत आहे. दरम्यान कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सुधारत आहे. कोरोना व्हायरस संकटावर मात करत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे सरकारचे अथक प्रयत्न सुरु आहेत. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे सकारात्मक परिणाम संपूर्ण जगाच्या आशा पल्लवित करत आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर येथील वॉटर सप्लाय प्रोजेक्टचे शिलान्यास करणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडेल. मणिपूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत तेथील रहिवाशांना शुद्ध पाणी मिळावे हा या मागील उद्देश आहे. दरम्यान आसाम, बिहारवर ओढावलेल्या पूराच्या संकटामुळे अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

5 ऑगस्ट रोजी अयोध्या येथील श्री राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम रंगणार असून त्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान यावरुन काहीसं राजकारणही रंगलं. मात्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनही होणार हे आता निश्चित झाले आहे.