देशात 24 तासात 38,902 नवे कोरोना रुग्ण, 543 मृत्यू; एकूण कोरोना बाधितांची संख्या 10,77,618 वर, पहा संपूर्ण आकडेवारी
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) माहितीनुसार, देशात मागील 24 तासात कोरोनाचे 38,902 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासोबतच आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10,77,618 वर पोहचली आहे. ही आजवरची एका दिवसातील सर्वात मोठी वाढ असुन भारत लवकरच 11 लाख कोरोना ग्रस्तांचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे, मात्र यातील दिलासादायक बाब अशी की एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये सुद्धा केवळ 3,73,379 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत, तसेच 6,77,423 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 63 टक्के इतका झाला आहे. दुसरीकडे कालच्या दिवसभरात देशात कोरोनाने 543 जणांचा बळी घेतल्याचे समजत आहे, यानुसार आजवरची कोरोना मृतांची संख्या 26,816 वर पोहचली आहे. तोंडाला चव नसणे म्हणजे कोरोना पॉझिटीव्ह? जाणून घ्या PHFI चे डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांचा सल्ला

आयसीएमआर च्या माहिती नुसार, आजवर देशात कोरोना साठी एकूण 1 कोटी 37 लाख 91 हजार 869 टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यापैकी 3,58,127 टेस्ट तर केवळ कालच्या 24 तासात पार पडल्या आहेत, या टेस्टच्या तुलनेत कोरोना रुग्णांचा आकडा कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे असे म्हणायला हरकत नाही.

ANI ट्विट

दरम्यान, सध्या कोरोनावरील लस शोधण्यात यश आले नसले तरी सकारात्मक प्रगती होताना दिसत आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) संशोधकांनी विकसित केलेली कोविड-19 (Covid-19) च्या लसीच्या चाचणीचे सुरुवातीच्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक दिसून आले आहे. तर भारतात आजपासून आयसीएमआर तर्फे वृद्धांमध्ये कोरोना विरूद्ध BCG लसीच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी बहु-केंद्रित अभ्यास सुरू करण्यात येणार आहे.