कोरोनाचा संशय असलेल्या नागरिकांना आता घर बसल्या आपली ही शंका दूर करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने कोविड19 - मदत ही टेलिमेडिसीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाईन क्रमांक 09513615550 वर कॉल करून आपल्या मनातील शंका दूर करता येणार आहे.

नाशिक येथे आणखी 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 48 वर पोहचला आहे.

ए प्रसाद, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील जवळजवळ 62 गर्भवती महिलांना वेगळे ठेवण्यात आले होते. आता त्यांची कोरोना विषाणू चाचणी नकारात्मक आली आहे. या महिला कोरोनाची पॉझिटिव्ह चाचणी आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या.

अमेरिका, मुख्यत्वे न्यूयॉर्क येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. यूएस मीडियाने याबाबत माहिती दिली आहे.

 

एएफपीने दिलेल्या माहितीनुसार,  ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी कमीतकमी पुढील तीन आठवड्यांसाठी कोरोना व्हायरस लॉकडाउन वाढविला आहे.

महाराष्ट्रात आज कोरोना बाधित 286 रुग्णांची व 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. मृतांमध्ये 4 पुण्यातील व 4 मुंबईमधील रुग्णांचा समावेश आहे. अशाप्रकारे राज्यात कोरोना व्हायरसची एकूण संख्या 3202 आणि मृत्यू 194 झाले आहेत.

 

दिल्लीत रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये असे निर्देशन केंद्र सरकारने दिले आहेत.

भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 12,759 वर पोहचला तर 420 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे येथे जवळजवळ 62 गर्भवती महिला कोरोनाबाधित रुग्णासोबत संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Load More

महाराष्ट्र राज्यातील कोरोना विषाणूंचा वेढा अधिक मजबूत होताना दिसत आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 2000 च्या पार गेली आहे. तर मुंबई, पुणे शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या दोन शहरांकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. तसंच नागपूर मध्येही गरजू आणि बेघर असलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेनिंग सुरु करण्यात आले आहे. अन्न, आरोग्य आणि इतर सुविधांसह त्यांच्यासाठी खास उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात त्यांना विविध गोष्टी शिकता येतील आणि भविष्यात नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना फायदेशीर ठरतील.

दिवसेंदिवस राज्यातील विशेषत: मुंबईतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे स्वाभाविकच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. कोरोना व्हायरसच्या आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस सोबत आर्थिक संकटही घेऊन आला आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी अर्थतज्ञांची टीमही उभी करण्यात आली आहे. तर भारत देशात कोरोना व्हायरसची दहशत दिवसागणित वाढत आहे. त्यामुळेच पुढील धोका टाळण्यासाठी देश 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. देशात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या 10000 च्या पार गेली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

इटली, स्पेन पाठपोठ अमेरिकेत थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने गेल्या 24 तासांत तब्बल 2600 नागरिकांचा बळी घेतला आहे. अमेरिकेतील गंभीर परिस्थितीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "अमेरिकेत आता कोरोनाचे शिखर पार गेले आहे."