कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महड आणि पाली येथील गणपती दर्शन बंद ठेवण्यााच निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 31 मार्च पर्यंत ही दोन्ही मंदिरे बंद राहणार आहे. 

Coronavirus: औरंगाबाद एफडीए प्रशासानाने जप्त केले 50 लाख रुपयांचे बनावट सॅनिटायजर्स जप्त केले आहेत. वळूंज येथे ही कारवाई करण्यात आली. एक्सपायरी डेट बदलून आणि भेसळ करुन हे सॅनिटायजर्स विकण्यासाठी येथील एका कंपनीतून पाठवले जाणार होते. तपर्यंतच औरंगाबद एफडीए प्रशासनाने ही कारवाई केली.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ कार्यरत झाले आहेत. त्यांनी मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार केल्यास कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. सॅनिटायजरमध्ये भेसळ करणाऱ्या तिघांवर नुकतीच प्रशासनाने पुणे येथे नुकतीच कारवाई केली होती

चंद्रपूर येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पीडित मुलगी 4 महिन्यांची गर्भवती आहे. मैत्रिणीच्या वडीलानेच तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती आहे.

पुणे येथील एका महिलेवर मुंबई येथे बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टीव्ही मालिकेत काम मिळवून देण्याच्या अमिषाने दोन व्यक्तिंनी या तरुणीला मुंबईला आणले. इथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, आरोपी नागपूर येथे पळून गेल्याची माहिती आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं नागपूरला रवाना झाल्याचे समजते.

कोरोनामुळे हैदराबाद येथील युनिव्हर्सिटीमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हडपसर  येथे किरकोळ कारणावरुन 16 वर्षीय मुलाला नग्न करुन मारहाण करण्यात आली असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

पुणे येथे कोरोना संक्रमणाच्या रुग्णांत वाढून होऊन 16 वर आकडा पोहचला आहे. 

कालाबुर्गाई येथील 76 वर्षीय वृद्धाचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला असून त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून मुंबई दर्शनसारख्या टूर्स 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. 

Load More

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरात प्रचंड हाहाकार माजला अजून परदेशात अडकलेले भारतीय नागरिक आपल्या मायदेशी परतण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहे. असेच काही भारतीय विद्यार्थी इटलीतील (Italy) मिलान (Milan) शहरात अडकून पडले होते. त्यांना शनिवारी एअर इंडियाच्या विमानातून भारतात परत पाठविण्यात आले आहे. यात 211 भारतीय विद्यार्थी असून 7 संशयित रुग्ण देखील आहेत. इटलीसह आणि कोरोना बाधित देशात भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. यात काही कामानिमित्त गेलेले, काही फिरायला गेलेले देखील लोक आहेत.

त्याचबरोबर कोरोनाच्या पार्शभूमीवर वाडी रत्नागिरीतील जोतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर-जोतिबाच्या चैत्र यात्रेवर देखील कोरोनाचे सावट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून येथील मंदिर प्रशासनाने मध्यरात्रीपासून हे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

त्याचबरोबर मुंबईत आज भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मांडवा येथे रो रो सेवेच्या रो पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे.