गुरुवायूर श्री कृष्णा मंदिर 13 जूनपासून भाविकांसाठी बंद असेल, कारण जवळच असलेले चावक्कड व वडक्ककड हे कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित केले गेले आहेत. उद्या होणाऱ्या विवाहसोहळ्यांना परवानगी असणार आहे.  गुरुवायूर देवस्थान, त्रिवेंद्रम यांनी ही माहिती दिली.

पंजाबमध्ये जीवनावश्यक वस्तू तसेस सेवा देणारी दुकाने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहतील. तर रेस्टॉरंट्स (फक्त होम डिलिव्हरीसाठी) आणि दारूची दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील, असं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

आज दिल्लीत 2137 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली. आज राजधानीमध्ये 71 मृत्यूंची नोंद झाली असून, 667 लोक बरे झाले आहेत. दिल्लीत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 36,824 इतकी झाली आहे.

वंदे भारत मिशन फेज 3 अंतर्गत एअर इंडिया भारत आणि अमेरिका दरम्यान 10 अतिरिक्त विमाने, 20 जून ते 3 जुलै दरम्यान चालवणार आहे. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनकडून प्रत्येकी 4 आणि एसएफओ आणि शिकागोकडून प्रत्येकी एक विमान असेल. यासाठी बुकिंग 13 जून रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून फक्त एअर इंडियाच्या वेबसाइटवर सुरु होईल.

मुंबईत आज 1372 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची व 90 मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात आज 943 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईमधील एकूण रुग्ण संख्या 55,357 झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जून रोजी, 21 राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये, पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल, चंडीगड, गोवा, मणिपूर, नागालँड, लडाख, पुडुचेरी, अरुणाचल, मेघालय, मिझोरम, ए अँड एन बेटे, दादर नगर हवेली आणि दामण दीव, सिक्किम आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जून रोजी 15 राज्यांच्या / केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील - महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशा.

  

नोएडा येथे एका दिवसात 95 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, चेंगलापट्टू, गुरुग्राम, जयपूर, जोधपूर, कोलकाता/हावरा, इंदोर, दिल्ली येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून येणाऱ्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात यावे असे  हिमाचलच्या स्पेशल आरोग्य विभागाने म्हटले आहे.

जम्मू कश्मीर येथे आणखी 156 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 2086 वर पोहचला आहे.

दिल्लीतील असिस्टंट सबइन्सपेक्टर यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

Load More

भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाचा धोका वाढत आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असली तरीही अद्याप भारतात कोरोना व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही अशी माहिती आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे. सध्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतामध्ये लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू आहे. तर काही प्रमाणात शिथिलता देऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम सुरू आहे.

दिल्लीमध्ये काही प्रार्थनास्थळं सुरू केली होती. मात्र दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमामांनी ही मशिद 30 जून पर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रातही 10% कर्मचार्‍यांसह खाजगी कार्यालयं सुरू केली जात आहे. मात्र कर्मचार्‍यांना ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, बेस्ट बस व्यवस्था पुरेशी नसल्याने आता अनेकांनी खाजगी वाहनं रस्त्यावर काढल्याने ट्राफिक जामची मोठी समस्या आहे. बसमध्येही मर्यादित प्रवासी असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.