मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यांच्या सीमा सरसकट उघडण्यात येणार नाहीत असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याबाबात ट्विटवरुन माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान मोदी यांनी 20 लाख रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याचे म्हटले. मात्र, काही वेळातच चूक त्यांच्या ध्यानात आली आणि त्यांनी सर्वांकडून टायपोमिस्टेक होऊ शकते असे सांगत 20 लाख कोटी अशी दुरुस्थी केली.

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर  हैदराबादच्या लोकप्रिय आणि सर्वात उंच खैरताबाद गणेश मूर्तीच्या आयोजकांनी यंदा मूर्तीचा आकार आधीच्या नियोजित  66 फूटांवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजबाबत समाधान व्यक्त केले आहे. हे समाधान व्यक्त करत असताना ''लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. प्रधानमंत्र्यांनी आज २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ही समाधानाची बाब आहे. आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा'', असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी लघु उद्योग, कॉटेज उद्योग आणि ग्रामीण उद्योगांना दिलेले हे समर्थन उद्योग कधीही विसरू शकत नाही. यामध्ये काम करणार्‍या 11 कोटीहून अधिक कामगारांना दिलासा मिळाला आहे. आम्ही एक सुपर आर्थिक शक्ती बनू, या संकटातून बाहेर पडून विकासाच्या दिशेने जाऊ, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात आज कोरोना व्हायरसच्या नवीन 1026 प्रकरणांची व 53 मृत्यूंची नोंद झाली. यासह राज्यात एकूण रुग्णांची संख्या आता 24,427 वर पोहोचली आहे, यामध्ये 921 मृत्यूंचा समावेश आहे.

मुंबईत आज 426 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14781 पोहोचली आहे.

 

लॉकडाऊन ४ हा वेगळा असेल. यासंदर्भात 18 मे अगोदर माहिती दिली जाईल. यातील नियम वेगळे असतील.

आर्थिक पॅकेजमध्ये मध्यम वर्गीयांसाठी शेतमजूर, कामगार, आदींसाठी तरदूरी करण्यात आल्या आहेत.     

भारतासाठी २० लाख कोटी रुपयांचे 'आत्मनिर्भर भारत अभियान' विशेष पॅकेज.  या पॅकेजमुळे २०२० मध्ये अर्थव्यवस्थेला नवी गती देईल. हे आर्थिक पॅकेज अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे आहे. अर्थमंत्री यासंदर्भात बुधवारी अधिक माहिती देतील.   

Load More

देशभरात कोरोना विषाणूची (Coronavirus) स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्यामुळे आतापर्यंत लॉकडाऊन देखील वाढत चालले आहे. यामुळे अनेक स्थलांतरित मजूरांनी गावचा रस्ता धरला आहे. या मजूरांनी त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेने आतापर्यंत 450 श्रमिक स्पेशल रेल्वे सोडल्या असून 5 लाखांहून अधिक स्थलांतरित मजूरांना त्यांच्या निश्चित स्थळी सोडले आहे. ही माहिती रेल्वे कार्यकारी संचालक आर.डी.बाजपेयी यांनी दिली आहे. या रेल्वेने अनेक स्थलांतरित मजूर, विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यांत सोडण्यात आले आहेत.

भारतात सद्य स्थितीत 20917 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 44029 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात भारतात 4213 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 1559 जणांची प्रकृती सुधारली आहे. देशात रिकव्हरी रेट 31.15 टक्के असल्याचे ही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी पाहता 67,152 वर आकडा पोहचल्याची माहिती लव अगरवाल यांनी दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 23 हजारांच्या पार गेला आहे. तर बळींचा आकडा 868 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. परंतु विविध ठिकाणची कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत.