मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी करौली येथील पुजार्‍याच्या मृत्यूची चौकशी सीआयडी सीबीचे पोलिस अधीक्षक विकास शर्मा यांच्याकडे सोपविली आहे: राजस्थानच्या मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 26व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सने 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. ट्वीट-

  

17 ऑक्टोबर रोजी 'मिशन शक्ती' सुरू करून. उत्तर प्रदेश सरकार महिलांची सुरक्षा, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी येणारा नवरात्र उत्सव समर्पित करणार आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

तेलंगणा: हैदराबादच्या माधापूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत वॉचमन म्हणून काम करणार्‍या 50 वर्षीय व्यक्तीचा, एक वेगवान फरारी कार अंगावरून गेल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत एफआयआर नोंदविला आणि गाडी चालकास अटक केली आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधित उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या आता 13 हजारांच्याही खाली आली असून, ही संख्या नक्कीच समाधानकारक असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला 45 टक्के, तर राखीव गटांसाठी 40 टक्के गुण पुरेसे ठरणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

 

मुंबईमध्ये 2199 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 1709 जणांना डिस्चार्ज देण्या आला आहे. तसेच 42 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,29,450 इतकी झाली आहे.

गुजरातमध्ये आज 1181 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे पथक हाथरस केसच्या तपासासाठी हाथरस येथे पोहोचले असून या पथकाने स्थानिक प्रशासनाकडून काही कागदपत्रे मागितली आहेत.

कर्नाटक: बेंगळुरूच्या महादेवपुरा हद्दीत जुगार खेळणाऱ्यांकडून मध्यवर्ती गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात 80 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

 

Load More

देशात कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट कायम असले तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येतही घट झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण 60 लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या 5 राज्यांमध्ये एकूण 61% अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तसंच एकूण रिकव्हरीपैकी 54.3% रिकव्हरी याच 5 राज्यांत आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशात अनलॉक 5 सुरु आहे. त्याअंतर्गत विविध सेवा-सुविधा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, राज्यात नोव्हेंबर पर्यंत सर्व सेवा सुरु करुन जनजीवनाची गाडी रुळावर आणण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोविड-19 वर नियंत्रण मिळवण्यात यश येत असले तरी लसीच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लस आल्यानंतर जनजीवन पूर्णत: पूर्ववत होण्यास नक्कीच मदत होईल.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वामित्व योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत देशातील सर्व गावांमधील संपत्तीचा लेखाजोखा ड्रोनच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यात प्रायोगित तत्वावर ही योजना सुरु करण्यात येईल. ग्रामीण भारतात बदल घडवून आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.