महानायक अमिताभ यांच्याबरोबरचं बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

अमिताभ यांच्या प्रकृतीसाठी सचिन तेंडुलकर यांनी प्रार्थना केली आहे.

 

अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभ यांनी स्वत: ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवीन पदाधिकाऱ्यांना मान्यता दिली असून यात 15 उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांचा समावेश आहे.

राजस्थानमध्ये आज 574 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

केरळ मधील सोने तस्करी प्रकरणी मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हिच्यासह परिवाराला NIA ने ताब्यात घेतले आहे.

पश्चिम बंगाल येथे गेल्या 24 तासात आणखी 1344 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 26 जणांचा बळी गेला आहे.

मुंबईत आज कोरोनाचे आणखी 1308 रुग्ण आढळून आले आढळून आले असून 39 जणांचा बळी गेला आहे.

कर्नाटक येथे येत्या 22 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

Load More

मुंबईत (Mumbai) एकीकडे कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तर दुसरीकडे आगीच्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. मुंबईतील बोरीवली (Borivali) भागात एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीचे रौद्र रुप पाहता तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. यामुळे 14अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली आणि या आगीत काही वित्तहानी झाली आहे का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप हाती लागलेली नाही. अग्निशमन विभाग ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत राज्यात एकूण 2,38,461 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 9,893 रुग्णाचा बळी गेला आहे. तसेच 1 लाख 32 हजार 625 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 55.62 टक्के आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (Public Health Department) माहिती दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर पोहचला आहे. त्यातील 4,95,513 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2,76,685 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात एकूण 21,604 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health & Family Welfare) देण्यात आली आहे.