कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये कमीतकमी 1 जूनपर्यंत लॉकडाउन राहणार असल्याचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी सांगितले आहे.

 

पुणे शहरात आज नव्याने १०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये ८१, खासगी रुग्णालये १२ आणि ससूनमधील ९ रुग्णांचा समावेश नाही. आजच्या १०२ रुग्णांसह एकूण संख्या आता २ हजार ४८२ झाली आहे.  

बुलडाणा जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे.

 

अमरावती मधील कोविड रुग्णालयातून 15 जणांना डिस्चार्ज आज डिस्चार्ड देण्यात आला आहे.

 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली मधील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये मनमोहन सिंह यांना निरीक्षणासाठी ठेवले आहे.

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 1,278  नवे रुग्ण आढळले आहेत तसेच ५३ नव्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा  22,171 इतका झाला आहे तर आजवर कोरोनाने  832 बळी घेतले आहेत. याबाबत महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे.

परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत, तसेच महाराष्ट्रातील मजूर इतर राज्यांतून परत येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीसहायतानिधी मधून तिकिटाचे शुल्क भरण्याचा घेतला निर्णय घेतला आहे.

 

रत्नागिरीमध्ये मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात रेल्वेचे डबे रुळावरून घसरले आहेत.

 

नोएडा येथे आणखी 2 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 218 वर पोहचला आहे.

पॅसेंजर ट्रेन येत्या 12 मे पासून सुरु करण्याचा विचार असून फक्त 15 गाड्या (30 रिटर्न फेऱ्या) सोडण्यात येतील असे रेल्वेमंत्रालयाने म्हटले आहे.

Load More

कोरोना व्हायरस संकटाबाबत आता जगभरातील प्रत्येक व्यक्तीला माहिती झाले असेल. आता पत्येकाला उत्सुकता फक्त इतकीच की, हे संकट कधी दूर होणार. या संकटाशी दोन हात करताना जगभरातील प्रत्येक देशातील नागरिकीक प्रचंड प्रयत्न करत आहे. त्या त्या देशातील यंत्रणाही या संकटासाठी उपाययोजना करत आहेत. अशा स्थितीत कोविड 19 म्हणजेच कोरोना विषाणूबाबत जे आकडे समोर येत आहे ते अत्यंत धक्कादायक आहेत. जगभरामध्ये लाखो नागरिकांना कोरोना व्हायरस बाधला आहे. तर, हजारोंचा मृत्यू झाला आहे.

भारतातही कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या हळूहळू मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही वाढ सध्यातरी नियंत्रणात असली तरी, भविष्यात वाढणारच नाही असे नाही. ही संख्या भविष्यात वाढणार किंवा नाही, हे आपण काय उपाययोजना करतो आणि नागरिक म्हणून या उपाययोजनांसाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. कोरनाबाबतचे ताज्या घटना घडामोडी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवत असतो.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाचा सामना करताना महाराष्ट्र सरकार विविध निर्णयही घेत आहे. जसे की येत्या शैक्षणिक वर्षात शाळांनी शुल्कवाढ करु नये. अशा निर्णयांबाबतची माहितीही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.