केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. तसेच या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त 200 खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहिल्यामुळे याभागातील रुग्णांना आहे तेथेच उपचाराची सुविधा मिळणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ट्वीट- 

 

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. याच मुंबईत मुंबईत कोरोनाबाधितांनी 40 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  दिवसभरात 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्वीट- 

  

तेलंगणा येथे COVID19 चा आकडा 2792 वर पोहचला आहे.

गोरेगाव मधील  Nesco Exhibition Centre येथे कोविड19 च्या क्वारंटाईनची सोय करण्यात आल्यानंतर  देवेंद्र फडणवीस  यांनी भेट दिली आहे.

दिल्लीत कोरोना व्हायरसचे संक्रमण झालेल्या 63 वर्षीय वृद्धाने रुग्णालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

महाराष्ट्रात आज कोरोनाबाधितांचा आकडा 70,013 वर पोहचला आहे. तर आज 2361 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 76 जणांचा बळी गेला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हरियाणा येथे नवे 265 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने  आकडा 2356 वर पोहचला आहे.

धारावीत आणखी 34 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 1805 वर पोहचला आहे.

CBI च्या दोन अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Load More

कोरोना व्हायरस (Coranavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) हे सध्या समिकरण झाले आहे. असे असले तरी सर्वच काही नकारात्मक आहे असे नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि लॉकडाऊन हळूहळू शिथील करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच त्याचे सुतोवाच केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या फेसबुक लाईव्ह संबोधनात लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरस संकटस्थितीबाबत माहिती दिली. राज्य कोरोनाच्या संकटावर मात करते आहे हे आत्मविश्वासपूर्वक सांगत लॉकडाऊन हळूहळू शिथील करण्याबाबतही त्यांनी सांगितले. आता यापुढे लॉकडाऊन नाही तर 'मिशन बिगनिंग अगेन' म्हणजेच 'पुनश्च हरी ओम' सुरु करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत असतानाच आता पावसाळाही जवळ येऊन ठेपला आहे. मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्याजवळ आला आहे. अल्पावधीतच तो महाराष्ट्रात प्रवेश करुन महाराष्ट्र व्यापेन असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुसऱ्या बाजूला कोरोना संकट आणि पावसाळ्यात निर्माण होणारी स्थिती अशा दुहेरी आव्हानांचा सामना महाराष्ट्राला करावा लागणार आहे.

दरम्यान, कोरोना संकटाचा समाना करत असताना लॉकडाऊन हळूहळू शिथील करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये 10% कर्मचाऱ्यांना उपस्थिती लावण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यासोबतच अनेक निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. परंतू, नागरिकांनी कोणत्याही स्थितीत नागरिकांनी गर्दी टाळावी. जेणेकरुन पुन्हा निर्बंद लादावे लागू नयेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल झाल्यावर महाराष्ट्र कसा सामोरा जातो, याबाबत उत्सुकता आहे. कोरोना व्हायरस, मान्सून, लॉकडाऊन, राजकारण आणि विविध क्षेत्रांतील ठळक घटना, घडामोडी यांबाबतचे अपडेट जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.