Navdeep Singh Dies By Suicide: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. 2017 मध्ये, NEET चे ऑल इंडिया टॉपर, डॉ. नवदीप सिंग यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ते मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होते. 25 वर्षीय डॉ. नवदीप सिंग रेडिओलॉजीमध्ये एमडी करत होते. रविवारी सकाळी नवदीपचा मृतदेह दिल्ली पारसी अंजुमन (पारशी धर्मशाळा) येथे त्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आयपी इस्टेट पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉ. नवदीप सिंग यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. क्राईम टीमशिवाय एफएसएलने नवदीपच्या खोलीची तपासणी केली. चौकशीनंतर त्यांची खोली सध्या सील करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून तो तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवला आहे. सध्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. डॉ.नवदीप सिंग यांनी असे पाऊल का उचलले? हे देखील वाचा: Wolf Attack in Bahraich: बहराईचमध्ये लांडग्याची दहशत, 11 वर्षाच्या मुलावर हल्ला, ऑपरेशन भेडिया सुरु
पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही
View this post on Instagram
नवदीप सिंग यांनी दिल्लीतील राहत्या घरी केली आत्महत्या
The Suicide of Dr Navdeep Singh should make everyone question about what is so horrifically wrong with the medical system of the country that this profession has become number 1 in terms of suicides !
He was a doctor who secured “AIR 1 IN NEET UG 2017”
He was currently doing MD…
— Dr.Dhruv Chauhan (@DrDhruvchauhan) September 15, 2024
डॉ. नवदीप सिंग हे मुक्तसर साहिब, पंजाबचे रहिवासी होते:
डॉ. नवदीप सिंग हे मूळचे मुक्तसर साहिब, पंजाबचे रहिवासी होते. नवदीप सिंगच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. किनवदीप सिंगने असे पाऊल का उचलले हे त्यांनाही समजू शकलेले नाही.