Monsoon 2020 Updates; कोकण, गोवा आणि महाराष्ट्रासह 'या' भागात पुढील 2-3 दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता-IMD
Mumbai Rains| Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

जूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर रविवारी हवामान खात्याने मध्य-नॉर्थ अरेबियन समुद्र, गुजरात, दादरा-नगर हवेली, महाराष्ट्रातील उर्वरित भागासह मुंबईत सुद्धा साऊथ मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली होती. तर आता कोकण, गोवा, महाराष्ट्र, सब हिमालयन पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथे पुढील 2-3 दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता आयएमडी यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

साऊथ वेस्ट मान्सूनसाठी परिस्थिती निर्माण झाल्याने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात तो पुढील 48 दाखल होणार असल्याचे आयएमडी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच साऊथ वेस्ट मान्सूनने नॉर्थ अरबी समुद्र, गुजरात, संपूर्ण दीव, मध्य प्रदेशातील काही भाग, छत्तीसगढ, झारखंड आणि बिहार, पूर्व उत्तर प्रदेशात आणखी व्यापला गेल्याची ही माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.(Monsoon 2020 Updates: मध्य-नॉर्थ अरेबियन समुद्र, गुजरात आणि महाराष्ट्रासह 'या' भागात साऊथ वेस्ट मान्सून दाखल- IMD)

दरम्यान, आयएमडी यांच्याकडून सोमवार आणि मंगळवारसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथील आयसोलेटेड परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे अतिमुसळधार ते तुफान पावसाची शक्यता दर्शवली जाते. तर जून 12-23 (8.30-8.30), हलक्या स्वरुपाचा पाऊस 91.3mm) आणि सांताक्रुझ(2.1mm) पडणार असल्याचे ही आयएमडी यांनी म्हटले आहे.