सावधान! सोशल मीडियावर अश्लीलपणे व्यक्त व्हाल तर होणार कारवाई
फोटो सौजन्य- PTI

सोशल मीडियावर अश्लीलपणे व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असाल तर तर वेळीच सावध व्हा. कारण आता केंद्र सरकारने या घटनांमध्ये दखल घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व सोशल मीडियावर देण्यात येणारी खोटी माहिती किंवा अश्लील चाळे थांबविण्यासाठी एक खास यंत्रणा लवकरच बनविण्याचे ठरविले आहे.

गृह सजीव राजीव नौबा यांनी गुरुवारी सोशल मीडियावरील घटनांसंबंधी सभा घेतली होती. त्यावेळी सोशल मीडियावर पुरवल्या जाणाऱ्या माहितीची योग्य तपासणी करावी. तसेच अश्लील चाळे आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणी सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास त्याचे प्रथम सोशल मीडियावरील अकाऊंट लगेच बंद करण्यात येणार आहे. तर आरोपीला कमीत कमी तीन वर्षाची शिक्षा होणार असल्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

यापूर्वीसुद्धा व्हॉट्सअॅपवरील अफवेमुळे खूप हिंसक गोष्टी घडल्याचे समोर आले आहे. यामुळे गूगल, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, यू टूब यांच्या प्रतिनिधींनी सुद्धा अशा घटनांपासून सावध रहावे असे त्यांना सांगण्यात आले आहे.