बॉलीवूड अभिनेते आणि खासदार सनी देओल (BJP MP Sunny Deol) यांच्या मतदारसंघात ते हरवले असल्याचे पोस्टर (Missing Posters) लागले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल पंजाबमधील गुरदासपूर मतदारसंघातून (Gurdaspur Constituency) भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. पंरतु, निवडून आल्यानंतर ते आपल्या मतदारसंघाकडे फिरकले नसल्याने स्थानिकांमध्ये त्यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे गुरदासपूर मतदारसंघातील प्रमुख शहर असलेल्या 'पठाणकोट' (Pathankot) येथे सनी देओल हरवले असल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स कोणी लावले आहेत, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
निवडणुका तोंडात आल्या की, अनेक कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. पंरतु, निवडून आल्यानंतर मात्र आपल्या मतदारसंघात फिरकतदेखील नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी पसरते. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये खासदार गौतम गंभीर हरवले असल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावेळी गौतम गंभीर यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. (हेही वाचा - धक्कादायक! 2018 मध्ये प्रतिदिन सरासरी 109 बालकांचे लैंगिक शोषण; अल्पवयीन मुलांवरील बलात्काराच्या घटनेत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर)
Punjab: 'Missing' posters of Sunny Deol, BJP MP from Gurdaspur constituency, seen in Pathankot pic.twitter.com/SHGpMsxlaq
— ANI (@ANI) January 13, 2020
सनी देओल यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते. काही दिवसांपूर्वी सनी देओल यांनी सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून गुरप्रीत सिंह पलहेरी यांची नियुक्ती केली होती. परंतु, याला विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला होता.