Madhya Pradesh Viarl video: ओव्हरटेक केल्याच्या रागातून तरुणांना बेदम मारहाण, उपविभागीय दंडाधिकारी निलंबित
Madhya Pradesh Viral PC Twitter

Madhya Pradesh Viarl video:  दोन तरुणांना वाहनाला ओव्हरटेक केल्याच्या रागात उपविभागीय दंडाधिकारी यांनी मारहाण केल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी एसडीएम सिंग, त्यांचाय चालक नरेंद्र दास पणिका, तहसीलदार विनोद कुमार आणि तहसीलदारांचे सहाय्यक संदीप सिंग यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रकाश दहिया आणि शिवम यादव अशी या घटनेत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. माराहाणी नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे,  शहरातील एसडीएम सिंग रस्त्यावर दोन तरुणांना काठीने माराहाण करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसडीएम यांना कामावरून निलंबित करण्यात आले आहे. ९ सेंकदच्या व्हिडिओत काही लोक दोन तरुणांना काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहे. सोमवारी या प्रकरणाची माहिती उमरियाच्या सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात देण्यात आली. या घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. रस्त्यावरून जात असताना एसडीएम सिंग यांच्या कारला ओव्हरटेक केल्याचे हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

एका स्थानिकांना हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर एकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी कारवाई करण्याची विनंती केली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.