ऑपरेशनसाठी घेऊन जात असलेले पैसे चोराने लांबविले
फोटो सौजन्य- Pixabay

लखनऊमध्ये केजीएमयूच्या नेत्र रोग विभागातच्या समोरुन एका सायकल चोराने 50 हजार रुपयांची रोकड लांबविली असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रुग्णाच्या समोर डोळ्यांचे ऑपरेशन कसे करावे हा प्रश्न उभा राहिला आहे.

बांगरमऊ येथे राहणारा अजीत कुमार असे या रुग्णाचे नाव आहे. त्याला डाव्या डोळ्यांनी कमी दिसत असल्याने त्याला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले होते. त्यावेळी अजीत कुमार हा रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या एका दुकानात जात असताना या चोराने त्याच्या खिशातील पैसे लांबविले आहेत.

या घटनेची माहिती पोलिसांना या पीडित तरुणाने दिली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून रुग्णाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यानुसार आरोपीला पकडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.