जम्मू-काश्मीर: भारतीय जवानांकडून ३ दहशतवाद्यांना कंठस्नान
(Photo Credits: ANI)

भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांसोबत भारतीय जवानांची चकमक घडली. या वेळी भारतीय जवानांनी दहशदवाद्यांना तोडीस तोड उत्तर दिले. हीचकमक श्रीनगर येथील फतेहकदाल गावात बुधवारी पहाटे घडली. प्राप्त माहितीनुसार तीनही दहशतवादी लष्कर-ए-तोएबाशी संबंधीत आहेत.

दरम्यान, या कारवाईत एक पोलीस अधिकारी शहीद झाला. चकमक घडलेल्या परीसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलीसांना खबऱ्यांमार्फत कळली होती. त्या माहितीवरुन पोलीसांनी कारवाई केली असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, सोमवारी रात्रीही दहशतवाद्यांनी जम्मू काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात जवानांच्या छावनीवर हल्ला केला होता. यात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले होते.