Television Rating Points: टीआरपी म्हणजे काय? दुरचित्रवाणी वाहिन्या खरोखर TRP गडबड करतात का? कोणाला कसा होतो फायदा?

कोणत्या प्रकारचे कार्यक्रम, विषय लोकांना पाहायला आवडतात हे टीआरपीवरुन ठरते. इतकेच नव्हे तरी अलिकडे काही वृत्तवाहिन्यांनीही आपले कार्यक्रम टीआरपीचे आकडे पाहून बदलल्याचे सांगितले जाते.

TV TRP | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

TRP Calculation In India: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी बार्क (BARC) म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउन्सील (Broadcast Audience Research Council) डिवासईसमध्ये काहीतरी छेडछाड करुन काही वाहिन्या आणि वृत्तवाहिन्या आपला टीआरपी (TV Channels TRP) म्हणजेच टेलिव्हीजन रेटींग पॉइंट्स वाढवत असल्याची खळबळजनक माहिती दिली. यात रिपब्लिक टिव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा वाहिणीचा समावेश आहे. त्यामुळे सहाजिकच आहे की हे टीआरपी म्हणजे काय? (What is TRP) टीआरपीचा (TRP) वाहिन्यांशी कसा सबंध असतो. त्याचा फायदा कोणाला आणि कसा फायदा होतो? याबाबत जोरदार चर्चा नव्याने सुरु झाली. म्हणूनच टीआरपी बाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी.

टीआरपी म्हणजे नेमके काय?

टीआरपी म्हणजे टेलीविजन रेटिंग पॉइंट. हे एक प्रकारचे यंत्र (मशीन) असते. जे काही घरांमध्ये लावले जाते. ज्यातून लोक कोणत्या प्रकारचे कार्यक्रम पाहतात. कोणते चॅनल किती वेळ पाहतात. याची माहिती मिळते. एखाद्या कार्यक्रमाला मिळणारा टीआरपी अधिक आहे. याचा अर्थ तो कार्यक्रम लोकप्रिय आहे. जादा टीआरपीचे आकडे पाहून जाहिरातदार संबधित वाहिनी अथवा संबंधित वाहिनीवरील कोणत्या कार्यक्रमाला किती जाहीरात द्यायची हे ठरवत असतो. तसेच, कोणत्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांना पाहायला आवडतात याबाबतही माहिती मिळते. अगदीच साध्या शब्दांमध्ये सांगायचे तर कोणत्या स्तरातील लोक कोणत्या प्रकारच्याहिन्या पाहतात. लोकांची कार्यक्रमांबाबतची अभिरुची काय आहे. याची माहिती मिळते. ज्यामुळे वाहिन्यांना आपले कार्यक्रम, कार्यक्रमाचा दर्जा, कार्यक्रमाची दिशा पाहायला मोठी मदत मिळते. एक बराच मोठा डेटा तयार होतो.

TV TRP | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

टीआरपी किती आणि का महत्त्वाचा?

टीआरपीचे आकडे म्हणजेच संपूर्ण प्रेक्षकांचा एकूण आकडा असे म्हणाता येणार नाही. तसे म्हटले तरी ते पूर्ण सत्त असणार नाही. कारण टीआरपी मशिन अनेक परिसरांमध्ये काही घरांमध्येच लावले जाते. ज्या घरांमध्ये टीव्ही पाहिला जातो. जसे की असे सांगितले जाते की मुंबई शहरात साधारण 2000 टीआरपी मशीन आहेत. त्यामुळे टीआरपी असलेल्या घरांमध्ये जी चॅनल बहुतांश पाहिली जातात तीच चॅनल (वाहिनी) अथवा कार्यक्रम अधिक लोकप्रिय किंवा त्यालाच जास्त टीआरपी असे मानले जाते. त्यामुळे टीव्ही प्रेक्षकांचा ठोस आकडा पुढे येत नसला तरी ठोकळेबाज काही माहिती नक्कीच हाती लागते. (हेही वाचा, Fake TRP Racket: खोट्या टीआरपी रॅकेट प्रकरणी दोन जणांना अटक; रिपब्लिकन चॅनलचे नाव तपासात पुढे आल्याची मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची माहिती)

टीआरपीचा फायदा काय?

टीआरपीचे आकडे पाहून वाहिन्या आपले कार्यक्रम, कार्यकमाचा दर्जा आणि दिशा ठरवतात. कोणत्या प्रकारचे कार्यक्रम, विषय लोकांना पाहायला आवडतात हे टीआरपीवरुन ठरते. इतकेच नव्हे तरी अलिकडे काही वृत्तवाहिन्यांनीही आपले कार्यक्रम टीआरपीचे आकडे पाहून बदलल्याचे सांगितले जाते.

TRP | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

जाहीरातदाराचे बारीक लक्ष, जाहिरातींशिवाय वाहिनी चालवणे कठिण

दरम्यान, जाहिरात हा कोणत्याही वृत्तवाहिनीचा प्रमुख पाया आहे. जाहीराती नसतील तर वृत्तवाहिन्या चालवणे कठीण होऊन बसेल. जाहिरातीशिवाय वृत्तवाहिनी चालवणे केवळ प्रसारभारतीसारख्या सरकारी कंपनीलाच जमू शकते. खासगी कंपन्यांचे ते काम नव्हे. त्यामुळे जाहिरातीतून टीव्ही चॅनल (दुरचित्रवाणी वाहिन्या) मिळणाऱ्या पैशांवर वाहिन्यांचे लक्ष असते. जाहिराती मिळविण्यासाठी आणि आपल्या कार्यक्रम किती लोकप्रिय आहे. हे पाहण्यासाठी त्याची चॅनलला मदत होते. दुसऱ्या बाजूला जाहिरातदारांचे टीआरपीच्या आकड्यांकडे बारिक लक्ष असते. कारण त्याला त्याचे उत्पादन, संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. त्यामुळे ज्या चॅनलला टीआरपी अधिक त्या चॅनलला जाहीरात द्याण्यास जाहिरातदार अधिक उत्सुक असतो. त्यामुळे वाहिनीसाठी जाहिराती अधिक हव्या असतील तर टीआरपी अधिक असावा लागतो असा एक ढोबळ संकेत आहे. (हेही वाचा, 'Fake BARC TRP Ratings' Case: खोट्या टीआरपी प्रकरणी Republic TV मुंबई पोलिस आयुक्तांविरोधात दाखल करणार मानहानीचा खटला; 'आम्हाला मुद्दाम लक्ष्य केले जात आहे'- Arnab Goswami)

TV TRP | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

टीआरपी कसा मोजला जातो?

बार्क (BARC) म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउन्सील (Broadcast Audience Research Council) टीआरपी मोजत असते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 45 हजार घरांमध्ये टीआरपी डिवाइस लावण्यात आले आहे. टीआरपी मशिनला बार-ओ-मीटर किंवा पीपल मीटर असे म्हणतात. हे मीटर शो एम्बेड वॉटरमार्क्स रेकॉर्ड करते.

टीआरपी मशिन कसे काम करते?

ज्या घरात टीआरपी मशीन लावलेले असते त्या मशीनला एक बटन असते. घरातील जो सदस्य वाहिनीवरील कार्यक्रम पाहतो त्या वेळी त्याने ते बटन दाबायचे. ज्यामुळे मशिनमध्ये संबंधित टीव्हीवर कोणता टीव्ही चॅनलवरचा कोणता कार्यक्रम पाहिला जात आहे याची माहिती मिळते.

टीआरपीच्य आकड्यांवरुरन कळते लोक कोणत्या प्रकारचे कार्यक्रम पाहतात. किती वेळ टीव्ही पाहतात. कोणते चॅनल पाहतात.

TV TRP | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

बार्क (BARC)

बार्क ही एक इंडस्ट्री बॉडी आहे. ज्यात जाहितदार, जाहिरात कंपन्या, प्रसारण कंपन्या यांचा समावेश आहे. या सर्व घटकांची मालकी बार्ककडे आहे. तसेच इंडियन सोसायटी ऑफ अॅडवर्टाईजर्स, इंडियन ब्रॉडकॉस्टींग फाऊंडेशन आणि अॅडवर्टायजिंग एजन्सी असोशिएशन ऑफ इंडिया संयुक्त मालक आहे.

टीआरपीच्या माहितीचा बार्क कसा करते वापर?

आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बार्क आपला डेटा जाहीर करते. यात वेगवेळे विभाग करुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. कोणता कार्यक्रम किती वेळ पाहिला गेला याचीही माहिती जाहीर केली जाते.

TV TRP | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

स्पष्टच सांगायचे तर जवळपास 45 हजार घरांमध्ये लावलेले डिवाईस सांगतात की कोणते कार्यक्रम किती काळ पाहिले जातात. त्यावरुनच कार्यक्रमांची लोकप्रियता मोजली जाते. दरम्यान, बार्क डिवाईसची माहिती गोपनीय ठेवते. म्हणजेच ती कोणत्या घरांमध्ये लावली आहेत याबाबत माहिती उघड केली जात नाही. दरम्यान, टीआरपी डिवाईसबाबत छेडछाड केल्याचे आरोप याही आधी लागले आहेत. परंतू, मुंबई आयुक्तांनी केलेले आरोप याच श्रृंकलेतील नवा टप्पा आहे. परंतू, एखाद्या चॅनलवर अशा प्रकारचा आरोप होण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी.