होमलोनधारकांसाठी खुशखबर! SBI ची नवी ऑफर; कोणत्याही शुल्काशिवाय करा लोन ट्रान्सफर
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक ऑफर सादर केली आहे.
सध्याच्या काळात घराच्या स्वप्नपूर्तीसाठी लोनचा आधार घेतला जातो. मात्र त्याच्या हफ्त्याची रक्कम व्याजदरावर ठरते. स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) होम लोनधारकांसाठी एक दिलासादायक ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही तुमचे होमलोन (Home Loan) इतर कोणत्याही बँकेतून SBI मध्ये ट्रान्सफर करु शकता. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. इतकंच नाही तर SBI मध्ये व्याजदरही अगदी कमी असेल. यामुळे तुमचा हफ्ता कमी होण्यास नक्कीच मदत होईल. ही ऑफर फक्त महिनाभरापूरतीच मर्यादीत आहे. त्यामुळे जर तुम्ही होमलोन ट्रान्सफर करण्याचा विचार करत असाल तर 28 फेब्रुवारी तुम्हाला सर्व प्रक्रिया करणे गरजेचे आहे. (पाच लाख रुपये जिंका! SBI ग्राहकासाठी मोठी संधी, कसा कराल अर्ज?)
यासंदर्भातील SBI ने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "लोन स्वीच करुन आनंद मिळवा. कोणत्याही शुल्काशिवाय SBI मध्ये तुमचे लोन ट्रान्सफर करा. ही ऑफर केवळ 28 फेब्रुवारीपर्यंत मर्यादीत आहे."
'बॅलन्स ट्रान्सफर ऑफ होमलोन' असे या सुविधेचे नाव असून SBI ने इतर बँकेच्या होमलोन धारकांसाठी ही सुविधा सुरु केली आहे. या ऑफरअंतर्गत शेड्युल कर्मशियल बँक, प्रायव्हेट आणि फॉरेन बँक, फायनान्स कंपनीज, सेंट्रल आणि राज्य सरकारी बँकेकडून कडून लोन घेतलेले लोनधारक एसबीआयमध्ये लोन ट्रान्सफर करु शकतात.
SBI मध्ये लोन ट्रान्सफर करण्याचे फायदे
- कमी व्याजदर
- शुन्य प्रोसेसिंग फी
- महिलांना व्याजदरात विशेष सूट
होमलोन ट्रान्सफर करण्यासाठी पात्रता
- भारतीय रहिवासी असणे गरजेचे.
- वयोमर्यादा: 18-75 वर्षे
- कर्जकालावधी: 30 वर्षे
SBI मध्ये लोन ट्रान्सफर करण्यासाठी लोनधारकांकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे.