ITR Filing For 2019-20: आयटी रिटर्न फायलिंग करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी; अन्यथा भरावी लागेल पेन्लटी
Income Tax Filing (Photo Credits: Pixabay)

आर्थिक वर्ष 2019-20 चे आयटी रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी आहे. आयकर विभागाकडून (Income Tax Department) आयटी रिटर्न भरण्यासाठी वारंवार मूदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, अजूनही तुम्ही फायलिंग केली नसेल तर ही तुमच्यासाठी अंतिम संधी आहे. दरवर्षी आयटीआर रिटर्नची अंतिम तारीख 30 जून असते. परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे यात अनेकदा मूदतवाढ देण्यात आली.

रिटर्न फायलिंग करण्यासाठी अंतिम तारखेपर्यंत वाट पाहू नका. काही वेळेस आयकर विभागाच्या वेबसाईटवर सर्व्हर प्रॉब्लेम येतो तर काही वेळेस कागदपत्रांची जुळवणी करण्यातही घोळ होऊ शकतो. त्यामुळे शेवटच्या तारखेपर्यंत न थांबता वेळीच फायलिंग करणे योग्य ठरेल. यासोबतच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर अचूक माहिती भरणे गरजेचे आहे. जर एखादी माहिती भरण्यास चूक झाल्यास टॅक्स रिफंड मिळण्यास विलंब लागू शकतो.

ITR फायलिंग भरताना या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा:

अचूक इन्कम टॅक्स फॉर्म निवडणे: इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करताना योग्य तो इन्कम टॅक्स फॉर्म भरणे अतिशय महत्त्वाचे आहे. चुकीचा आयटीआर फॉर्म भरल्यास तुमची फायलिंग अवैध ठरु शकते.

योग्य Assessment Year ची निवड: योग्य त्या फॉर्मसोबत रिटर्न फायलिंगचे आर्थिक वर्ष सुद्धा अचूक निवडणे गरजेचे आहे. आर्थिक वर्ष 2019-20 म्हणजेच assessment year 2020-21.

टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर प्रोसेस व्हेरिफाय करणे अनिवार्य आहे. (अद्याप ITR भरला नसल्यास या गोष्टी ठेवा लक्षात)

पेन्लटी: यावर्षी सरकारने पेन्लटी रक्कमेत वाढ केली आहे. गेल्या वर्षी 5000 असलेली पेन्लटीची रक्कम आता 10,000 करण्यात आली आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार. यंदाच्या वर्षी अजून पर्यंत 8,43,506 इन्कम टॅक्स रिटर्न आले आहेत.