Representational Image (Photo Credits: File Photo)

इंस्टिट्युट ऑफ बॅंकिंग पसर्नल सिलेक्शन  (IBPS) कडून आरआरबी ऑफिसर्स ( स्केल 1,2,3) आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) या पदांवर नोकरभरतीसाठी आता नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. आईबीपीएस च्या ऑफिशिएअल वेबसाईटवर याकरिता ऑनलाईन अर्ज आज, 8 जून पासून सुरू झाले आहेत. दरम्यान तुम्हीदेखील त्यासाठी इच्छुक असाल तर ibps.in वर अर्ज दाखल करू शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 जून 2021 आहे. नक्की वाचा: Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वे 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; rrc-wr.com वर 24 जून पर्यंत असा करा अर्ज.

कसा कराल अर्ज?

पात्रता निकष

आरआरबी ऑफिसर्स (स्केल 1, 2, 3) आणि ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे. दरम्यान पदांनुसार, विविध पात्रता निकष आहेत. त्यामुळे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज कराल त्याची सविस्तर पात्रता निकष जाणून घ्या.

वयोमर्यादा

ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) या पदासाठी उमेदवाराचं वय हे 18 ते 28 वर्ष असणं आवश्यक आहे. तर ऑफिसर स्केल 1 (असिस्टेंट मॅनेजर) साठी 18-30 वर्ष. ऑफिसर स्केल 2 (असिस्टेंट मॅनेजर) साठी 21 पेक्षा जास्त आणि 32 पेक्षा कमी वय अपेक्षित आहे. तर ऑफिसर स्केल 3 (सिनियर मॅनेजर) पदासाठी वय 21 वर्ष पेक्षा जास्त आणि 40 पेक्षा कमी असणं आवशय्क आहे. दरम्यान वय हे 1 जून 2021 पर्यंत लक्षात घेतलं जाणार आहे.

दरम्यान ऑफिस असिस्टेंट साठी 5134 पदं, ऑफिसर स्केल 1 साठी 3876 पदं आणि ऑफिसर स्केल 2,3 1283 पदांवर ही नोकरभरती होणार आहे. यामध्ये प्रवेशशुल्क आकारले जाणार आहे.