Majhi Ladki Bahin Yojana Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती तपासा; पैसे मिळणार की नाही? घ्या जाणून
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जही दाखल झाले आहेत. मात्र, हे अर्ज स्विकारले आहेत किंवा नाही, पैसे मिळणार की नाही याबाबत अर्जाची स्थिती जाणून घेणे (Majhi Ladki Bahin Yojana Status) घेण्यासाठी इथे दिलेल्या पायऱ्यांचा वापर करा.
Online status of CM Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) जाहीर केली. राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य आणि सक्षमीकरण प्रदान करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आलेल्या या योजनेस जोरदार पाठिंबा मिळतो आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर भार टाकणारी आणि इतर सरकारी योजना आणि विभागांना आर्थिक झळ पोहोचविणाऱ्या या योजनेच्या लाभासाठी लाखो महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. अनेक महिलांचे दाखल झालेले अर्ज स्वीकारण्यात आले आहेत तर काहींचे फेटाळण्यात आले आहेत. काही अर्ज पडताळणीसाठी सुरु असल्याने राखून ठेवण्यात आले आहेत. अशा स्थितीत अर्जाची स्थिती जाणून घेणे (Majhi Ladki Bahin Yojana Status) आणि त्या आधारे योजनेचा लाभ होऊन पैसे मिळणार की नाही, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच जाणून घ्या अर्जदाराच्या अर्जाची विद्यमान स्थिती कशी तपासायची.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तीन पद्धतींचा अवलंब करता येतो: पहिली पद्धत अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईटला भेट देऊन आणि दुसरे म्हणजे मोबाईल App च्या माध्यमातून. तिसरा पर्याय म्हणजे ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट देणे. पण तिसरा पर्याय काहीसा वेळखाऊ आहे. कारण या केंद्रांवर बरीच गर्दी असते. (हेही वाचा, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांना दिलासा! ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार)
पद्धत पहिली: ऑनलाइन तपासणी
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: माझी लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रवेश करा.
- लॉगिन: तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी तुमची नोंदणीकृत क्रेडेन्शियल्स वापरा.
- अर्जाची स्थिती तपासा: आवश्यक विभाग किंवा पर्याय शोधा जो तुम्हाला अर्जाची स्थिती तपासण्याची परवानगी देतो.
- आवश्यक तपशील प्रविष्ट करा: आवश्यक माहिती प्रदान करा, जसे की अर्ज क्रमांक किंवा संदर्भ आयडी.
- स्थिती पहा: तपशील सबमिट करा आणि सिस्टम तुमच्या अर्जाची सद्य स्थिती प्रदर्शित करेल. (हेही वाचा, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांना दिलासा; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या रकमेत होणार वाढ, CM Eknath Shinde यांची ग्वाही)
पद्धत दुसरी: Nari Shakti Doot App
- ॲप डाउनलोड करा: Google Play Store वरून नारी शक्ती दूत ॲप (Nari Shakti Doot App) डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. ॲप अगोदरच इन्स्टॉल असेल तर अपडेट करुन अपडेट घ्या. आगोदरच अपडेटेड असेल तर उत्तम.
- लॉगिन करा: तुमची क्रेडेन्शियल्स वापरून ॲपमध्ये लॉग इन करा.
- प्रवेश योजना: माझी लाडकी बहिन योजनेच्या विभागात प्रवेश करा. इथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील. संबंधित विभागावर क्लिक करा.
- स्थिती तपासा: तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी पर्याय शोधा आणि ऑन-स्क्रीन सूचनांचे अनुसरण करा.
पद्धत तिसरी: ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट
- तुमच्या क्षेत्रातील जवळची ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्र शोधा.
- कार्यालयात जा आणि तुमच्या माझी लाडकी बहिन योजनेच्या अर्जाची स्थिती तपासण्याची विनंती करा.
- तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा संदर्भ क्रमांक अधिकाऱ्यांसोबत शेअर करा.
- अधिकारी तुमचे तपशील सत्यापित करेल आणि तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल तुम्हाला माहिती देईल.
दरम्यान, या योजनेचे राजकीय वर्तुळातून समर्थन होत असले तरी, विश्लेषकांकडून मात्र या ययोजनेवर प्रचंड टीका होत आहे. राज्य सरकार या योजनेसाठी पैसै कोठून आणणार आणि त्याचा वापर कसा करणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे ही योजना किती काळ सुरु राहणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.