Bank Holidays & Lockdown: देशातील नागरिकांसाठी यंदाचा एप्रिल महिना काहीसा आर्थिकदृष्ट्या धावपळीचा ठरणार आहे. देशावर आलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट. त्यात लॉकडाऊन. हे कमी की काय म्हणून या महिन्यात सरकारी सुट्ट्याही अधिक. यंदा सुरु असलेल्या एप्रिल महिन्यात शासकीय सुट्ट्यांचा इतका वर्षाव झाला आहे की, त्यामुळे बँका केवळ 15 दिवसच सुरु राहणार आहेत. याचाच अर्थ असा की, या महिन्यात बँका 14 दिवस बंद (Bank Holidays) राहणार आहेत. जाणून घ्या सुट्ट्या आणि कामाच्या वेळा.
एप्रिल महिन्यात सणांच्या आणि कामाच्या दिवशी असलेल्या इतर सुट्ट्या एकूण 9 असणार आहेत. याशिवाय या महिन्यात नेहमीप्रमाणे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेन. यासोबत साप्ताहिक सुट्ट्याही आहेतच. या सर्व सुट्ट्यांचा विचार करता बँका एकूण 14 दिवस बंद असणार आहेत. या महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँकांना कोणकोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत हे जाणून घेण्यासाठी Bank Holidays in April 2020: एप्रिल महिन्यात यंदा राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सह सुट्ट्यांमुळे 11 दिवस बंद राहणार बॅंकेचे आर्थिक व्यवहार.
संजय राऊत ट्विट
👏👏टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते
आता आग 🔥नाही लावली म्हणजे झालं. 😅
साहेब कामाचं आणि लोकांच्या
पोटा पाण्याचं बोलां.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2020
बँकांची आर्थिक व्यवहारांची वेळ ही सकाळी 10 ते दुपारी 2 अशी असते. शनिवारीही साधारण अशीच वेळ असते. मात्र, देशात असलेली लॉकडाऊन स्थिती विचारात घेऊन बँका केवळ 4 तासच सुरु ठेवण्याचे आदेश आहेत. त्यातच सरकारी आदेशानुसार बँक कार्यालयांमध्ये केवळ 50 टक्के कर्मचारीच उपस्थित असतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि व्यवस्थापनावर येणारा ताण वेगळाच.