Aadhaar Card Address Change Update: आधार कार्ड वर पत्ता अपडेट करण्याची पद्धत बदलली; जाणून घ्या नवी प्रक्रिया

अनेकदा घराचा पत्ता काही लोकांचा वारंवार बदलला जातो परिणामी तो बदल आधारकार्डावर देखील वेळोवेळी करावा लागतो.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

भारतामध्ये UIDAI अर्थात Aadhaar Card हे ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. सध्या अनेक मह्त्त्वाची कागदपत्रं ही आधारकार्डासोबत लिंक केलेली आहेत. त्यामुळे तुमच्या आधारकार्डावर अचूक माहिती असणं आवश्यक आहे. यापूर्वी UIDAI ने आधारकार्ड वर तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी कोणत्याही पुराव्याशिवाय पत्ता अपडेट करण्याचा पर्याय दिला होता पण आता UIDAI ने ही सेवा खंडीत केली आहे. आता पत्त्याचा पुरावा तुम्हांला सादर करणं बंधनकारक करण्यात आला आले आहे. नुकतेच एका ट्वीटर युजरला माहिती देताना अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर ही माहिती देण्यात आली आहे. 32 पैकी कोणत्याही लिटेस्ट कागदपत्रांच्या आधारे युजर्स आता आधारकार्ड वर पत्ता अपडेट करू शकतील. Aadhaar Card Update: आधार कार्डमधील मोबाईल नंबर बदलणे आणखी सोपे झाले, पोस्टमन घरी येऊन करणार अपडेट.

आधार कार्ड तुम्हांला वेळच्या वेळी अपडेट करणं आवश्यक आहे. सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात ते अपडेट करण्याची सोय आहे. पण नव्या पद्धतीनुसार आधार कार्ड वर पत्ता कसा अपडेट करायचा हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या त्याची नवी पद्धत

आधारकार्ड वर पत्ता कसा अपडेट कराल?

सरकारी उपक्रमांचा, सोयी-सुविधांचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्हांला आधारकार्ड अपडेटेड ठेवणं गरजेचे आहे. अनेकदा घराचा पत्ता काही लोकांचा वारंवार बदलला जातो परिणामी तो बदल आधारकार्डावर देखील वेळोवेळी करावा लागतो.