Aadhaar-PAN Details Mismatch: तुमच्या आधार-पॅन कार्डवर नाव आणि जन्मतारीख वेगवेगळी आहे का? पहा, कसे कराल दुरुस्त?
उदा. नाव, लिंग, जन्म तारीख इत्यादी. जर ही माहिती वेगवेगळी असेल तर लिंक करणे शक्य होणार नाही. ज्या व्यक्तींची आधार-पॅनवरील माहिती वेगवेगळी आहे. त्यांचे आधार-पॅन लिंक होणार नाही.
भारतात आधार आणि पॅन कार्ड ही महत्त्वाची ओळखपत्र आहेत. आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करण्यासाठी त्यावरील माहिती एकसमान असणे गरजेचे आहे. उदा. नाव, लिंग, जन्म तारीख इत्यादी. जर ही माहिती वेगवेगळी असेल तर लिंक करणे शक्य होणार नाही. ज्या व्यक्तींची आधार-पॅनवरील माहिती वेगवेगळी आहे. त्यांचे आधार-पॅन लिंक (Aadhaar PAN Link) होणार नाही. त्यामुळे त्यांना आधार किंवा पॅन कार्डवरील चुकीची माहिती बदलणे गरजेचे आहे. करदात्यांसाठी आधार-पॅन लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच या कार्डवरील चुकीची माहिती नेमकी बदलायची कशी? जाणून घेऊया... (Update Aadhaar Address Online: घरबसल्या आधार कार्ड मध्ये पत्ता कसा अपडेट कराल?)
या स्टेप्स फॉलो करा:
# नाव, लिंग, जन्मतारीख चुकीची असल्यास बायोमेट्रिक आधार प्रमाणिकरण (Biometric Aadhaar Authentication) करावे लागेल.
# National Securities Depository Ltd (NSDL) च्या अधिकृत वेबसाईटवरुन seeding request फॉर्म डाऊनलोड करा.
# हा एकपानी फॉर्म पॅन आणि आधार कार्डवरील माहितीनुसार वेगवेगळा भरावा लागेल. ऑफलाईन फॉर्म भरल्यानंतर बायोमेट्रिक आधार प्रमाणिकरण करण्यासाठी तुम्हाला जवळच्या पॅन केंद्राला भेट द्यावी लागेल.
# त्याचबरोबर आधार किंवा पॅन कार्ड मधील माहिती बदलल्यानंतर ते लिंक करण्यासाठी अर्ज करावा लागेल.
आधार कार्डवर डिटेल्स अपडेट करण्यासाठी युआयडीएआय (UIDAI) च्या अधिकृत वेबसाईट www.uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल. तर पॅन कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी https://www.utiitsl.com या अधिकृत वेबसाईटला व्हिझिट करावे लागेल.
आधार-पॅन कार्डवरील माहिती समान असूनही लिंक करण्यास समस्या उद्भवत असल्यास इन्कम टॅक्सच्य अधिकृत वेबसाईटवरुन संपर्क करा किंवा आयटी विभागातील हेल्पलाईन नंबर वरुन आपली तक्रार नोंदवा. दरम्यान, आधार-पॅन कार्ड वेळेत लिंक न केल्यास पॅन अवैध ठरेल. त्याचबरोबर 10,000 रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.