LPG Cylinder Price Hike: महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नव्या किंमती
दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आज 2355.50 रुपयांवर गेली आहे. कालपर्यंत म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत केवळ 2253 रुपये खर्च करायचे होते. त्याचबरोबर कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
स्वयंपाकघरात पुन्हा महागाईचा धक्का बसला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2253 रुपयांवरून 2355.50 रुपये झाली आहे. 5 किलोच्या एलपीजी (LPG) सिलेंडरची किंमत सध्या 655 रुपये आहे. गेल्या महिन्यात 1 एप्रिल रोजीही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकाच वेळी दरात 250 रुपयांनी वाढ करण्यात आली. आज रविवारी पुन्हा 102.50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. IOC नुसार, मुंबईत 2205 ऐवजी 2307 रुपये खर्च करावे लागतील. दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आज 2355.50 रुपयांवर गेली आहे. कालपर्यंत म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत केवळ 2253 रुपये खर्च करायचे होते. त्याचबरोबर कोलकात्यात 2351 ऐवजी 2455 रुपये, चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 2406 रुपयांवरून 2508 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
1 मे रोजी घरगुती सिलिंडरची किंमत
मुंबई - रु. 949.50
दिल्ली - रु. 949.50
कोलकाता - रु. 976
चेन्नई - रु. 965.50
हळूहळू भाव दोन हजारांच्या गेला पुढे
1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 105 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 22 मार्च रोजी 9 रुपये स्वस्त झाले. 1 ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1736 रुपये होती. आज म्हणजेच 1 मे रोजी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2355.50 रुपयांवर गेली आहे. म्हणजेच 7 महिन्यांत सिलेंडरचे दर 619 रुपयांनी वाढले आहेत. (हे देखील वाचा: महाराष्ट्र तापणार, पुढचे दोन दिवस उष्णतेची अधिक लाट, राज्यात ऑरेंज अलर्ट जारी)
त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान, व्यावसायिक सिलेंडरची किंमत 170 रुपयांनी वाढली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये ते 2000 झाले आणि डिसेंबर 2021 मध्ये ते 2101 रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी 2022 ला ते स्वस्त झाले आणि 1907 रुपयांवर आले. यानंतर 1 एप्रिल 2022 रोजी तो 2253 रुपयांवर पोहोचला होता.