Coronavirus Cases In India: भारतातील कोरोनाबाधित रुग्णांनी पार केला 17 लाखांचा आकडा; देशात गेल्या 24 तासात 54 हजार 736 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, तर 853 जणांचा मृत्यू
Coronavirus Outbreak | Representational Image| (Photo Credits: IANS)

Coronavirus Cases In India: भारतातील कोरोनाबाधित रुग्णांनी 17 लाखांचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासात 54 हजार 736 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली असून 853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 17 लाख 50 हजार 724 इतकी झाली आहे.

सध्या देशात 5 लाख 67 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 11 लाख 45 हजार 630 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे देशात आतापर्यंत 37 हजार 364 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - अवघ्या 30 सेकंदात मिळेल Coronavirus Test चा रिझल्ट; कोरोना टेस्टिंगसाठी 4 तंत्रांची ट्रायल करत आहेत भारत व इस्त्राईल)

दरम्यान, आज देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 17 लाखांपेक्षा अधिक झाला आहे. यातील 65 टक्के कोरोना रुग्ण जुलै महिन्यातील आहेत. याशिवाय महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्येदेखील झपाट्याने वाढ होत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, 9 हजार 601 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी बनत आहे.