युपी येथे वायुसेनेच्या लढाऊ विमानाला अपघात, न्यायालयाकडून तपासणी करण्याचे आदेश
कुशीनगर: वायुसेना लढाऊ विमान जगुआर अपघात (फोटो सौजन्य-ANI)

उत्तर प्रदेश (Utter Pradesh) येथे कुशीनगरमध्ये सोमवारी(28 जानेवारी) दुपारच्या दरम्यान वायुसेनेचे लढाऊ विमान जॅग्वार ह्याला अपघात झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पायलटला कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले जात आहे. कुशीनगर येथील एका गवातील शेतामध्ये या विमानाला अपघात होऊन खाली कोसळले आहे.

या अपघातानंतर वायुसेनेकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलेले आहे. तसेच या ऑपरेशनसाठी दोन हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली आहे. गेल्या वर्षी गुजरात येथे कच्छमध्ये सुद्धा लढाऊ विमान जॅग्वारला अपघात झाला होता. जून 2018 रोजी झालेल्या या अपघातात पायलट संजय चौहान यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, असे सांगितले जात आहे की हे विमान ट्रेनिंगच्या वेळी नेहमीप्रमाणे उड्डाण करत होते. परंतु उड्डाण केल्याच्या काही मिनिटांतच हा अपघात झाला आहे. तर न्यायालयाने या प्रकरणी अधिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

वायुसेनेतील एक महत्वपूर्ण लढाऊ विमान म्हणून जॅग्वार ओखळले जाते. तर दुश्मनांच्या सीमेच्या खुप आतमध्ये जाऊन हे विमान हल्ला करु शकते अशी याची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तसेच सोप्या मार्गाने या विमानाच्या मदतीने दुश्मनांचे कँम्प, एअरबेस आणि वॉरशिप्स वर निशाणा साधून हल्ला करता येतो. मात्र कमी उंचीवर हे विमान उड्डाण करत असेल तरीही दुश्मनांच्या नाकात दम आणेल अशी या विमानाची ताकद आहे.