मोहन भागवत | (Photo Credits: IANS)

देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहन भागवत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल, असंही ते म्हणाले.

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे. जबरदस्तीने नसबंदी करणार का? असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला आहे. (हेही वाचा - राष्ट्रीय स्वयंसेवक सघांचे सरसंघचालक मोहन भागवत नवीन संविधान बनवत असल्याची माहिती व्हायरल; संघाकडून पोलिसात तक्रार दाखल)

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी', या पुस्तकावरून राजकारण पेटलेले असाताना नवा वाद निर्माण झाला आहे. काही विरोधी पक्षांकडून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानात बदल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडियावर सध्या मोहन भागवत भारताचे नवीन संविधान बनवत असल्याची एक पीडीएफ फाईल व्हायरल होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पीडीएफ फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. परंतु, ही बाब खोटी असून संघाविरोधात खोटा प्रचार करण्यात येत असून संघाची बदनामी करण्यात येत असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.